उबाठांनी पाळलेल्या पोपटाने...; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर घणाघात
01-Apr-2025
Total Views | 45
मुंबई : सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत रौत उबाठासेनेचा पोपट झाला असून आता या उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे, असा घणाघात आमदार चित्रा वाघ यांनी केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी प्रत्युत्तर दिले.
चित्रा वाघ म्हणाले की, "सर्वज्ञानी संजय राऊत म्हणजेच रडत रौत म्हणजे उबाठासेनेचा पोपट झाला आहे. आता या उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगायला सुरूवात केली आहे. पण या स्वयं घोषित विश्वगुरूने स्वतःच्या घराकडे आधी लक्ष द्यावे. भारतीय जनता पार्टी आणि प्रधानमंत्री मोदीजी वगैरेंवर बोलण्याची एकतर त्यांची कुवत नाही आणि तुमच्या विश्लेषणाची आमच्या पक्षाला गरजही नाही," असे त्या म्हणाल्या.
"भारतीय जनता पार्टीचा पुढचा वारसदार वगैरेच्या गोष्टी बोलण्यापेक्षा जरा स्वतःच्या गटाला पडलेले खिंडार सांभाळा. जरा गटप्रमुख असलेल्या उबाठांना तर आपण विधानपरिषद आमदार आहोत याचादेखील विसर पडलाय. त्यांना त्यांच्या कामाची आठवण करून द्या. नाहीतर काही वर्षांत तुमच्या पक्षाचे अस्तीत्व देखील उरणार नाही," अशी टीकाही चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केली.