'मेरा येशू येशू' फेम पादरी बजिंदर सिंहला जन्मठेप!

    01-Apr-2025
Total Views | 32

Bajinder Singh

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bajinder Singh news) 
'मेरा येशू येशू' फेम ख्रिश्चन धर्मगुरू पादरी बजिंदर सिंह यास बलात्कार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी मोहाली जिल्हा न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. तीन दिवसांपूर्वी बजिंदर सिंह यास न्यायालयाने दोषी ठरवले होते, त्यानंतर त्यांची रवानगी पटियाला तुरुंगात करण्यात आली होती. अखेर मंगळवारी त्यास जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

हे वाचलंत का? : ईदच्या दिवशी धामी सरकारचे धाडसी पाऊल; औरंगजेबपुरचे झाले शिवाजी नगर!

मोहालीच्या पॉक्सो न्यायालयाने पादरी बजिंदर सिंह याला जिरकपूर येथील एका महिलेचा लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणात सदर शिक्षा सुनावली आहे. फिर्यादीने आरोप केला होती की, बजिंदरने पीडित महिलेस परदेशात नेण्याचे आमिष दाखवून तिच्याच राहत्या घरी तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओही बनवला. तिने आपल्या मागण्या मान्य न केल्यास व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी बजिंदरने दिल्याचा आरोप तिने केला होता.


Bajinder Singh

ज्या प्रकरणात बजिंदरला शिक्षा झाली होती, त्या प्रकरणात झिरकपूर पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून बजिंदर सिंगसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. यामध्ये अकबर भाटी, राजेश चौधरी, सुचा सिंग, जतिंदर कुमार, सितार अली आणि संदीप उर्फ ​​पहेलवान यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाने सहा आरोपींची निर्दोष मुक्तता केली. मात्र बजिंदर विरोधात ठोस पुरावे असल्याने सदर प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121