‘विद्या’ सहकारात शोभते

    08-Mar-2025
Total Views | 21
 
International Womens Day Vidya Chaudhary
 
( International Womens Day Vidya Chaudhary ) 'विद्या विनयेन शोभते’ या संस्कृत सुविचारात ‘विद्या’ हे ज्ञान आणि ‘विनय’ म्हणजे विनम्रता याप्रमाणे सुशील आणि विनम्रतेने समृद्ध असलेल्या विद्या विजय चौधरी या ‘दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन’मध्ये ज्येष्ठ संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेली 17 वर्षे त्या सहकार क्षेत्रात असल्याने त्यांचे आप्तस्वकीय तसेच मित्रमंडळी त्यांना ‘विद्या सहकारात शोभते’ असे गमतीने म्हणतात.
 
विद्या चौधरी यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वालावल या गावी झाला. बालपण गावी कोकणात मजेत गेले. गावी जेमतेम ‘एस.एस.सी.’पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर विवाहानंतर सन 1980 मध्ये त्या ठाण्यात आल्या. गृहिणी म्हणून काम करीत असताना ठाण्याच्या वर्तकनगर, शिवाईनगर भागामध्ये शिवसेनेमधून त्यांनी सामाजिक कार्याला प्रारंभ केला. सुरुवातीला सेनेच्या कार्यकर्त्या म्हणून ठसा उमटविल्यावर विद्या यांची वर्तकनगर विभागाच्या उपशाखाप्रमुख म्हणून नियुक्ती झाली. समाजकार्यातील उल्लेखनीय कामाची दखल घेत 2008 मध्ये ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या प्रेरणेने फेडरेशनच्या महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आल्या. सामाजिक बांधिलकीमधून सहकाराची ओढ निर्माण झाली.
 
त्या माध्यमातून वर्तकनगर, लोकमान्य नगर, सावरकर नगर, शिवाई नगर भागातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या व त्या सोडविण्यासाठी विद्या यांनी प्रयत्न केले. ‘माजीवाडा कन्झ्युमर्स को-ऑप. सोसायटी लि.’ या संस्थेच्या त्या अध्यक्षाही होत्या. सध्या त्या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. ‘सहकारातून समृद्धी’ हा मूलमंत्र जपत विद्या चौधरी यांनी ‘हाऊसिंग फेडरेशन’च्या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. सध्या त्या शासनाच्या सहकार विभागाच्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पॅनलवर आहेत.
 
(अधिक माहितीसाठी संपर्क -9220532457)
अग्रलेख
जरुर वाचा
अनुराग कश्यपनं का सोडलं बॉलीवुड?

अनुराग कश्यपनं का सोडलं बॉलीवुड? 'ही' आहेत कारणं...

भारतीय चित्रपटसृष्टी पारंपारिकरित्या बॉलिवूडच्या वर्चस्वाखाली होती, परंतु सध्या दिग्दर्शक सर्जनशील स्वातंत्र्यासाठी या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदलत्या प्रवृत्तीमुळे भारतीय सिनेमाच्या कथा सांगण्याच्या शैलीत होणाऱ्या बदलांबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराग कश्यप यांनी आपल्या असामान्य कथनशैलीसाठी आणि प्रस्थापित नियमांना धक्का देण्याच्या तयारीसाठी ख्याती मिळवली आहे. मात्र, अलीकडील घडामोडींमध्ये कश्यप बॉलिवूडपासू..

जर नाचला नाहीस तर तुझं निलंबन करेन; लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रतापचा उन्माद

"जर नाचला नाहीस तर तुझं निलंबन करेन"; लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रतापचा उन्माद

Tej Pratap बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र आमदार तेज प्रताप यादव (Tej Pratap) यांचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल होत आहे. ज्याच ते पूर्णपणेल होळी सणानिमित्त रंगात रंगून गेलेले दिसत आहेत. एका व्हिडिओत तेज प्रताप यांनी पोलिसाला नाचण्याचे आदेश दिले. संबंधित व्हिडिओत तेज प्रताप एका पोलीस कॉन्स्टेबलला आवाज देत आहे. अरे कॉन्स्टेबल मी गाणे वाजवतो, तुला त्यावर नाचावे लागेल. वाईट वाटून घेऊ नकोस, होळी आहे. जर नाचला नाहीस तर तुला मी निलंबित करेन, यावरून संबंधित पोलिसाने लाजेकाजे सर्वांसमोर ..