‘आकांक्षा’ पुढती नभ ठेंगणे!

    08-Mar-2025
Total Views | 8

International Women day Akanksha Chaudhary
 
( International Women day Akanksha Chaudhary ) समाजाचे कल्याण करणे आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणे, हे सहकारी संस्थांचे उद्दिष्ट असते; हेच उद्दिष्ट मनी बाळगून गेली तीन दशके नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या संचालक आकांक्षा अविनाश चौधरी यांची वाटचाल समस्त महिलांसाठी प्रेरणादायी आहे.
 
आकांक्षा यांचा जन्म दि. 25 नोव्हेंबर 1966 रोजी जळगाव जिल्ह्यात झाला. वडील सेंट्रल रेल्वेत नोकरीला होते. भुसावळ येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. घरची परिस्थिती नाजूक असल्याने शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे जाणून त्यांनी पदवीनंतर ‘एम.कॉम.’ पूर्ण केले.
 
सन 1995 मध्ये लग्न करून ठाण्यामध्ये आल्या. त्यांचे पती 1989 पासून सहकार चळवळीमध्ये कार्यरत असल्याने त्यांचा ध्यास पाहून त्यांनीही सहकाराचा श्रीगणेशा केला. पतीसोबत 1995 पासून त्यादेखील सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अकाऊंटिंग व ऑडिट करू लागल्या. सध्या 100 पेक्षा जास्त गृहनिर्माण संस्थांचे लेखापरीक्षण व मार्गदर्शन त्या करीत आहेत. सुरुवातीला कल्याण जनता सहकारी बँकेत लिपिकाची तात्पुरती नोकरी केली. या अनुभवाच्या जोरावर सन 2015 मध्ये प्रथमतः सीताराम राणे यांच्या पॅनलमधून ‘दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप हाऊसिंग फेडरेशन’च्या निवडणुकीच्या माध्यमातून महिला राखीव गटातून त्यांची निवड झाली.
 
तेव्हापासून आजतागायत फेडरेशनवर संचालक म्हणून त्या कार्यरत आहेत. सहकारातील अध्वर्यु गुरुवर्य ‘ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट को. ऑप. हाऊसिंग फेडरेशन लि.’चे अध्यक्ष सीताराम राणे हे आपले प्रेरणास्थान असल्याचे त्या आवर्जून नमूद करतात.
 
शिक्षणाची आवड असल्याने लग्नानंतर शासनाची सहकार पदविका अभ्यासक्रम ‘जी.डी.सी. अ‍ॅण्ड ए.’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर शासनाच्या महालेखापरीक्षण पॅनलवर त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सहकार विभागाच्या ‘डी.सी.ए.’ आणि ‘डी.सी.एम.’ परीक्षेत यश प्राप्त केले. त्याचप्रमाणे ‘ड’ वर्ग व ‘इ’ वर्गाच्या निवडणुकीच्या पॅनलवर त्यांची निवड झाली. कळवा-खारेगाव-विटावा प्रभागात भारतीय जनता पक्षाच्या सहकार विभागाच्या चिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
 
वाचन, घरकामाची आवड जोपासत कुटुंबाचीही काळजी आवर्जून घेतात. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार’ व ‘सुषमा स्वराज पुरस्कारा’ने गौरविण्यात आले आहे. भविष्यात सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन खर्‍या अर्थाने महिलांच्या हाती सुरक्षित असेल, तो दिवस सुवर्णाक्षरांत नोंदवला जाईल, असे त्या मानतात. महिलांनी फक्त घरची जबाबदारी न सांभाळता, सहकारी संस्थांमध्ये प्रभावी नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तरच सहकाराच्या माध्यमातून महिलांना मोकळा श्वास घेणे शक्य होईल.
 
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9137588167)
अग्रलेख
जरुर वाचा
अनुराग कश्यपनं का सोडलं बॉलीवुड?

अनुराग कश्यपनं का सोडलं बॉलीवुड? 'ही' आहेत कारणं...

भारतीय चित्रपटसृष्टी पारंपारिकरित्या बॉलिवूडच्या वर्चस्वाखाली होती, परंतु सध्या दिग्दर्शक सर्जनशील स्वातंत्र्यासाठी या पारंपरिक चौकटीच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत. या बदलत्या प्रवृत्तीमुळे भारतीय सिनेमाच्या कथा सांगण्याच्या शैलीत होणाऱ्या बदलांबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुराग कश्यप यांनी आपल्या असामान्य कथनशैलीसाठी आणि प्रस्थापित नियमांना धक्का देण्याच्या तयारीसाठी ख्याती मिळवली आहे. मात्र, अलीकडील घडामोडींमध्ये कश्यप बॉलिवूडपासू..

जर नाचला नाहीस तर तुझं निलंबन करेन; लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रतापचा उन्माद

"जर नाचला नाहीस तर तुझं निलंबन करेन"; लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रतापचा उन्माद

Tej Pratap बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र आमदार तेज प्रताप यादव (Tej Pratap) यांचा एक व्हिडिओ शनिवारी व्हायरल होत आहे. ज्याच ते पूर्णपणेल होळी सणानिमित्त रंगात रंगून गेलेले दिसत आहेत. एका व्हिडिओत तेज प्रताप यांनी पोलिसाला नाचण्याचे आदेश दिले. संबंधित व्हिडिओत तेज प्रताप एका पोलीस कॉन्स्टेबलला आवाज देत आहे. अरे कॉन्स्टेबल मी गाणे वाजवतो, तुला त्यावर नाचावे लागेल. वाईट वाटून घेऊ नकोस, होळी आहे. जर नाचला नाहीस तर तुला मी निलंबित करेन, यावरून संबंधित पोलिसाने लाजेकाजे सर्वांसमोर ..