सहकार क्षेत्रातील ‘हिरकणी’

    08-Mar-2025
Total Views | 40

Hirkani in the cooperative sector Shailaja Gaste
 
( International Womens Day Shailaja Gaste Hirkani in the cooperative sector ) राजकीय, सामाजिक क्षेत्रासह प्रशासकीय सेवेत आपल्या कर्तबगारीची छाप पाडणार्‍या नारीशक्तीप्रमाणेच ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या एकूण 21 संचालकांपैकी चार संचालक महिला आहेत. शैलजा गस्ते धडाडीने कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा दि. 8 मार्च या ‘जागतिक महिला दिनी’ घेतलेला आढावा...
 
‘दि ठाणे डिस्ट्रिक्ट को. ऑप हाऊसिंग फेडरेशन’च्या विद्यमान संचालक शैलजा गिरीश गस्ते या मूळ तळकोकणातील सावंतवाडी तालुक्यामधील वाफोली गावच्या. विवाहानंतर बेळगाव, चिकोडी येथे गेल्या, तरी त्यांनी आपला मराठी बाणा सोडला नाही.
 
वडील रेल्वेत नोकरीला असल्याने शैलजा यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांचे कुटुंब मुंबईत भाड्याने वास्तव्य करीत होते. नंतर वडिलांनी स्वतःचे घर कल्याणमध्ये घेतल्यानंतर त्यांचे पुढील शिक्षण ठाणे जिल्ह्यात झाले. बारावी नंतर त्यांनी सहकारी पतपेढीत लिपिक ते व्यवस्थापकपदापर्यंत काही काळ काम केले. पतपेढीत तेव्हा ‘गव्हर्नमेंट ऑडिटर’ येत असत. त्यांच्या कामकाजाने प्रभावित होऊन पदवी घेतल्यानंतर शैलजा यांनी सहकार पदविका (जीडीसीए) पूर्ण केली. त्यानंतर लागलीच त्यांची नियुक्ती शासनमान्य लेखापरीक्षण पॅनेलवर झाली. प्रथमच एक महिला ऑडिटर बनल्याने, समाजात त्यांना एक वेगळा मानमरातब मिळू लागला. एकत्र कुटुंब पद्धतीत वावरणार्‍या शैलजा यांनी ‘कोरोना’ काळानंतर मुलांना वसतिगृहामध्ये ठेवले. पण, सहकाराचा वसा काही सोडला नाही. अशा प्रकारे चूल आणि मूल दोन्ही बाजू संभाळून सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
 
सहकार विभागातील कायदे व नियम या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी ‘हाऊसिंग फेडरेशन’मध्ये संपर्क वाढला. दरम्यान, ‘महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण’ यांच्या माध्यमातून सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात साहाय्यक म्हणून काम पाहिले. ‘कोविड’नंतर साधारण 2021 मध्ये ‘ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन’च्या संपर्कात आल्या आणि 2023 मध्ये थेट निवडणूक लढवून शैलजा गस्ते बहुमताने निवडून येत हाऊसिंग फेडरेशनच्या संचालक बनल्या.
 
‘हाऊसिंग फेडरेशन’चे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली शैलजा गस्ते या ‘डिम्ड कन्व्हेयन्स’, पुनर्विकास तसेच स्वयंपुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करीत आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थांसंबंधी विविध अडचणी सोडविण्यातही पुढाकार घेत आहेत. सहकार प्रशिक्षणाच्या वर्गांना मार्गदर्शन देण्यासह सोसायटी व्यवस्थापक या पदासाठी अनेक तरुणींना प्रोत्साहित करून फेडरेशनच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्यास सहकार्य केले आहे. याशिवाय, महिला बचतगट आणि महिलांच्या विविध संस्थांना शासकीय योजनांबाबत प्रबोधन करण्याचे कामही त्या करीत आहेत.
 
सहकार क्षेत्र महिलावर्गाला काम करण्यासाठी व्यापक आहे. एखादी महिला जर समर्थपणे कुटुंब सांभाळू शकते, तर समाजातील अन्य जबाबदार्‍याही लीलया पेलू शकते. कौटुंबिक व्यापातून वेळ काढून प्रत्येक महिलेने कोणत्या ना कोणत्या स्वरुपात सहकार क्षेत्रात अथवा सामाजिक कार्यात योगदान द्यायला हवे, असा सल्लाही शैलजा समस्त महिलावर्गाला देतात.
 
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9768564943)
अग्रलेख
जरुर वाचा
दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा

दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा 'अशी ही जमवा जमवी' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; 'या' तारखेला पाहायला मिळणार चित्रपट! जाणून घ्या

मैत्री, प्रेम, कुटुंब या विषयांवर आजवर बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत; मात्र राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित 'अशी ही जमवा जमवी' या चित्रपटात फक्त तरुणांचीच नाही तर वृद्ध मित्र मैत्रिणींचीसुद्धा एक धमाकेदार कहाणी आपल्याला अनुभवयाला मिळणार आहे. या दमदार आणि बहुप्रतीक्षित चित्रपटाचं टिझर प्रदर्शित झालंय, ज्यात अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दोन दिग्गजांची मजेदार जुगलबंदी पहायला मिळते. चित्रपटाचं नाव आणि रिलीझ झालेल्या टिझरवरून संपूर्ण सिनेमा पाहण्याची प्रेक्षकांची ..