हिंदुत्व केवळ उपासना नसून विचारांचा प्रवाह : इंद्रेश कुमार

    05-Mar-2025
Total Views |

Indresh Kumar on Hindutva

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Indresh Kumar on Hindutva) 
प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभात स्नान करून आलेल्या भाविकांचे एकत्रिकरण नुकतेच जोधपूरच्या प्रताप नगर आदर्श विद्या मंदिर शाळेत संपन्न झाले. राष्ट्रीय जनचेतना ट्रस्ट, जोधपूर आयोजित 'महाकुंभ : हिंदुत्वाचे विराट दर्शन' या कार्यक्रमात मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक इंद्रेश कुमार यांनी उपस्थितांना संबोधित केले. हिंदुत्व केवळ उपासना नसून विचारांचा प्रवाह असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान व्यासपिठावर सैनाचार्य अचलानंद गिरीजी महाराज देखील उपस्थित होते.

हे वाचलंत का? : ज्या देशात २% पेक्षा कमी हिंदू, तिथे तयार होतंय भव्य हिंदू मंदिर

उपस्थितांना संबोधत इंद्रेश कुमार म्हणाले, मकरसंक्रांती ते महाशिवरात्री पर्यंतचा काळ कुम्भचा असतो. मकर संक्रांतीच्या माध्यमातून धर्म आणि समाजाशी मैत्रीपूर्ण राहण्याचे प्रशिक्षण मिळते. हा उत्सव एकत्र राहण्याचा संदेश देतो. महाशिवरात्री हा शिवाच्या उपासनेचा दिवस आहे.

महाकुंभाविषयी बोलताना ते म्हणाले, "कुंभ हे मानसिक विकार दूर करण्याचेही माध्यम आहे. कुंभाचे आयोजन केवळ मानवाने मानव रहावे आणि राक्षस बनू नये यासाठी केले जाते. राम आणि रावण अनेक प्रकारे सारखेच होते, जसे दोघेही राजे होते, दोघेही शिवभक्त होते, दोघेही चारही वेदांचे जाणकार होते. पण फरक आचार आणि चारित्र्याचा होता, आचार आणि चारित्र्य यांच्या श्रेष्ठतेमुळे रामाची पूजा केली जात असे. रामाने शबरीची बेरी खाऊन समरसतेचा संदेश दिला होता.



अग्रलेख
जरुर वाचा
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना नाना पटोले यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर

Nana Patole उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी १० मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर खुर्च्यांच्या अदलाबदलीवरून चर्चाही झाल्या. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आमच्याकडे या आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, असे नाना पटोले म्हणाले. यामुळे आता राज्याच्या राजकीय परिस्थितीत उलथापालथ ..

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

जन्म–मृत्यू बाबतच्या बोगस प्रमाणपत्रांना चाप! अधिनियमात सुधारणा; तात्काळ अंमलबजावणीचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

सरकारी व्यवस्थेतील उणीवांचा लाभ घेत जन्म-मृत्यू नोंदणीची प्रमाणपत्रे मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांच्या हैदोसावर आता अंकुश बसणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, दि. १२ मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात निवेदन करून, विलंबाने करावयाच्या जन्म-मृत्यू नोंदीबाबतच्या कार्यपध्दतीनिश्चित केल्याचे सांगितले. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार आजपासूनच महाराष्ट्रात नवीन बदल लागू होतील, अशी घोषणा केली...

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

लाठी मारी ते विधवांची होळी! महाराष्ट्राबाहेर होळी नेमकी कशी साजरी केली जाते ?

होळी म्हणजे रंगांचा उत्सव. एका पौराणिक कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नी जाळू शकणार नाही असा वर मिळाला होता. हिरण्यकशपूने होलिकेला सांगितले की प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीवर बसावेस म्हणजे प्रल्हाद जळून मरेल आणि होलिका मात्र जिवंत राहील. हिरण्यकशपूचा सल्ला तिने ऐकला. परंतू प्रल्हादाने नारायणाचे नामस्मरण केल्याने होलिका जळून गेली आणि प्रल्हाद जिवंत राहिला या आनंदाप्रीत्यर्थ दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषकाली होलिकादहन केलं जाते. तसेच यावेळी दुष्ट प्रवृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना ..