मुंबई: ( sixth installment of Namo Shetkari Nidhi ) “राज्यातील ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’च्या सहाव्या हप्त्याची सुमारे २ हजार, १६९ सकोटी रुपये रक्कम लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दि. ३१ मार्च रोजीपूर्वी जमा करण्यात येत आहे,” अशी माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
यामुळे राज्यातील शेतकर्यांना पाडव्याच्या मुहूर्तावर आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यामुळे आज दिवसअखेर शेतकर्यांच्या खात्यात त्यांच्या हक्काची रक्कम जमा होणार आहे.याबाबत बोलताना कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, “शेतकर्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (पीएम किसान) योजना फेब्रुवारी, २०१९ पासून सुरू केली आहे. या योजनेच्या निकषांनुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबांस (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षांखालील अपत्ये) दोन हजार रुपये प्रतिहप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यांत प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहेत.”
एकूण पाच हप्ते वितरीत; कृषिमंत्र्यांची माहिती
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘पंतप्रधान कृषी सन्मान निधी योजने’मध्ये ‘पीएम किसान योजने’च्या प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी सहा हजार रुपयांच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर घालते. त्यानुसार राज्यातील शेतकर्यांना एकदा १२ नहजार रुपये प्रतिवर्षी लाभ देण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते दि. २६ लऑक्टोबर २०२३ रोजी शिर्डी येथून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा पहिला हप्ता देण्यात आलेला आहे. आजअखेर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’अंतर्गत एकूण पाच हप्ते वितरीत करण्यात आलेले असून राज्यातील 90.86 लाख शेतकरी कुटुंबांना ८९६१.३१ कोटींचा लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा करण्यात आलेला आहे.