"औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून तिथे एक मोठा बोर्ड लावा आणि..."; राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

    31-Mar-2025   
Total Views | 23

raj thackeray on aurangzeb tomb controversy
 
मुंबई : (Raj Thackeray on Aurangzeb Tomb Controversy) दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे रविवार दि. ३० मार्च रोजी पार पडला. यावेळी राज्यभरातून आलेल्या मनसैनिकांना मार्गदर्शन करताना मनसेअध्यक्ष राज ठाकरे विविध विषयांवर भाष्य केले. सध्या राज्यात सुरु असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर त्यांनी परखड मत मांडून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
औरंगजेबाच्या कबरीबाबत राज ठाकरे काय म्हणाले?
 
औरंगजेबाच्या कबरीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “औरंगजेबाची कबर तिथेच राहू दे. कबरीवरील सजावट काढून टाका. तिथे फक्त कबर दिसली पाहिजे आणि त्या ठिकाणी एक मोठा बोर्ड लावा. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला. हा आमचा इतिहास आहे”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
"शिवरायांच्या पराक्रमाची साक्षीदार म्हणून औरंगजेबाची कबर हवी"
 
"छत्रपती शिवाजी महाराज हे हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे, तो एक विचार आहे. हा विचार संपविण्यासाठी औरंगजेब शिवाजी महाराजांच्या निधनानंतर २७ वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून बसला, लढत राहिला, पण ते औरंगजेबाला जमलं नाही आणि शेवटी मराठ्यांनी त्याला इथेच गाडलं. जगाच्या इतिहासात जिथे जिथे औरंगजेब वाचला जातो, अभ्यासला जातो, तेव्हा तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले जाते. त्यामुळे औरंगजेबाची कबर उखडण्यापेक्षा स्वराज्याला संपविण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला, असा कबरीसमोर बोर्ड लावा आणि राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या सहली नेऊन हा पराक्रम त्यांना दाखवा" अश्या शब्दांत राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121