सोनिया गांधींच्या लेखाचा मुख्यमंत्र्यांकडून समाचार! म्हणाले, "शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण होत असेल तर यात कोणालाही..."

    31-Mar-2025   
Total Views | 66

cm devendra fadnavis on congress leader sonia gandhi
 
 
नागपूर : (CM Devendra Fadnavis on Sonia Gandhi's Article) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतेच एका लेखाच्या माध्यमातून भारताच्या नवीन शिक्षण पद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केली आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी सोनिया गांधींनी आता तरी भारतीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
 
"आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण होणे यात काहीच गैर नाही"
 
नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण होणे यात काहीच गैर नाही. लॉर्ड मेकालेने पत्रात म्हटलं आहे की, जोपर्यंत देशातील शिक्षणपद्धतीमध्ये बदल करत नाही तोपर्यंत इंग्रजांना भारतावर राज्य करता येणार नाही. इंग्रजांनी भारतीयांवर राज्य करण्यासाठी, गुलाम बनवण्यासाठी जुनी शिक्षण पद्धती आणली होती. त्यामुळे जर अश्या शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण होत असेल तर यात कोणालाही दुःखी होण्याचे कारण नाही. याउलट सोनिया गांधीनी याबाबत पूर्ण माहिती घ्यावी आणि या निर्णयाचे समर्थन करायला हवे." असे फडणवीस म्हणाले.
 
सोनिया गांधींनी लेखात नेमकं काय म्हटलंय?
 
एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात शिक्षणाचे केंद्रीकरण, व्यावसायीकरण आणि सांप्रदायिकीकरण सुरु असल्याच म्हटले आहे. सोनिया गांधी यांनी केंद्रावर, संघीय शिक्षा व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार राज्य सरकारांना महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाच्या बाहेर ठेऊन शिक्षणाचा संघीय पाया कमकुवत करत आहे, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे.
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121