मध्य प्रदेशात नवरात्रोत्सवात मांसाहरी पदार्थांवर बंदी, मैहार पालिकेचा मोठा निर्णय

    31-Mar-2025
Total Views | 17

Banned Nonveg

भोपाळ (Nonveg Banned) : हिंदू धर्मात चैत्र महिन्यात नवरात्री या सणाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणादरम्यान, ९ दिवसांचा उपवास असतो, अशावेळी दुर्गा पूजा केली जाते. तर सार्वजनिक मंडळ ९ दिवस देवीची देखभाल करतात. हे महत्त्व लक्षात घेता, नवरात्री दरम्यान, मध्य प्रदेशातील मैहरमध्ये मांसाहरी पदार्थाच्या विक्रीवर बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे धार्मिक पावित्र्याची अबाधित राहण्यास हातभार लागेल. याचपार्श्वभूमीवर आता प्रशासनाने संबंधित प्रकरणी काही आदेश जारी केले आहेत.
 
मध्य प्रदेशातील मैहरमध्ये ३० मार्च ते ७ एप्रिलपर्यंत सुरू असणाऱ्या चौत्र महिन्यात नवरात्रोत्सवाला समोर ठेऊन जिल्हा प्रशासनाने मांस विक्रीवर बंदी आणली आहे. मांस, अंडे अशा विक्रीला प्रशासनाने विरोध दर्शवला आहे. एसडीएम विकास सिंह यांच्या आदेशानुसार नवरात्रीदरम्यान, धार्मिक पवित्रता राहण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. श्रद्धाळूंच्या आस्थेच्या सम्मानासाठी प्रतिबंध लावण्यात आला आहे. दरम्यान, शहरात कोणत्याही वेळी मांस, अंड आणि मासे अशा वस्तूंची विक्री होता कामा नये, अशी प्रशासनाने ताकीद दिली होती.
होती.
 
 
 
मैहरला पर्यावरण विभागाला नवरात्रोत्सवाच्या काळात धार्मिक नगरी असल्याचे घोषित करण्यात आले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य भारतीय लोक शारदा मातेचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. अशातच मैहर नगरपालिका क्षेत्रात मांस, मासे आणि अंड्यांच्या विक्रीवर विरोध आहे.
 
स्थानिक प्रशासनाने सांगितले की, मांसहारी विक्रीवर रोक लावण्यात आला होता. काही दुकानदारांपर्यंत संबंधित माहिती पोहोचवणे प्रात्यक्षिकरित्या शक्य नाही. ज्यामुळे सार्वजनिक माध्यमांचा, वृत्तपत्रांच्या माध्यमातून, स्थानिक प्रशासनाच्या माहितीचे आदेश पोहोचवणे गरजेचे आहे. जर कोणी या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्या व्यक्तिविरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत गुन्हा दाखल करता येणार आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121