मेरठमध्ये ईदच्या दिवशी नमाजनंतर दोन्ही गटात राडा, गोळीबार दगडफेक करत सहाजण जखमी
31-Mar-2025
Total Views | 64
लखनऊ : उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ईदच्या नमाज अदानंतर दोन पक्षांमध्ये दोनदा हाणामारी झाली होती. सिवाल खासमध्ये नामाद अदा केल्यानंतर मुस्लिमांच्या दोन्ही गटांमध्ये गोळीबार आणि दगडफेकीची घटना घडली. या हाणामारीत सहाहून अधिकजण जखमी झाले आहेत.
३१ मार्च २०२५ रोजी सोमवारी शिवलखास शहरात ईदची नमाज अदा करण्यात आली होती. त्यानंतर मुस्लिम समुदायाचे सदस्य फातिहा पठण करण्यासाठी कालव्यावरील कब्रस्तानात जमले होते. ज्यावेळी फातिमाचे पठण सुरू असतना, आदल्या दिवशी झालेल्या वादावरून दोन्ही पक्षांमध्ये वादाला तोंड फुटले होते. वाद इतका वाढला होता की, दोन्ही लाठ्याकाठ्यांचा वापर सुरू झाला.
यूपी : मेरठ के जानी इलाके में ईद पर मुस्लिमों के दो पक्ष भिड़ गए। खूब लाठी-डंडे चले, एक-दूसरे पर पत्थर बरसाए। कई लोग घायल हैं। दोनों पक्षों में पुराना विवाद था। pic.twitter.com/ypBBR8P8sQ
दरम्यान, जोरदार हाणामारी करण्यात आली आणि दगडफेकही करण्यात आली होती. अनेकदा लोकांच्या पांढर्या कुर्त्या पायजम्यावरही चिखल फेकण्यात आला होता. दोन्ही बाजूंनी अनेक राऊंड गोळीबार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
गावकऱ्यांच्या मते, हा वाद नियात आणि बदाम कुटुंबांमध्ये झाला, ज्यात अनेक लोक जखमी झाले आहेत. यावेळी पोलीस घटनास्थळी होते आणि त्यांनी परिस्थिती शांत ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
एकाच समुदायाच्या दोन गटांमधल हाणामारीच्या घटनांबाबत पोलीस अधीक्षक ग्रामीण मेरठ म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.