दिल्लीत दुकानदाराचे नाव आणि आधार कार्ड लावावे

- भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    31-Mar-2025
Total Views | 10
 
MLA Tarvindar Singh letter to delhi CM on Shopkeeper name and Aadhar card should be displayed
 
नवी दिल्ली: ( jangpura MLA Tarvindar Singh letter to delhi CM on delhi Shopkeeper name and Aadhar card should be displayed ) दिल्लीतील दुकानांवर नामफलक सक्तीचे करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. याबाबत जंगपुरा येथील भाजप आमदार तरविंदर सिंग मारवाह यांनी नुकतेच मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना पत्र लिहिले आहे.
 
ग्राहकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांनी सर्व दुकानांच्या बाहेर त्यांचे नाव स्पष्टपणे लिहावे अशी मागणी पत्रात केली आहे. त्यांनी सांगितले की अनेक लोकांकडून तक्रारी येत होत्या. अनेकदा दुकानाचे नाव वाचून ग्राहक आत जातात, मात्र नंतर त्यांना कळते की ते मांसाहारी दुकान आहे. यामुळे लोकांना, विशेषतः शाकाहारी जेवण पसंत करणाऱ्यांना खूप त्रास होतो. मारवाह म्हणाले की, सध्या फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, परंतु पुढील दोन दिवसांत हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित केला जाईल. ग्राहकांच्या सोयीसाठी आणि पारदर्शकतेसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले.
 
तरविंदर मारवाह यांच्या मते, हा नियम केवळ सणासुदीच्या काळातच नव्हे तर वर्षभर दुकानदारांसाठी अनिवार्य केला पाहिजे. दुकानांच्या बाहेर नावाच्या पाटीसोबतच दुकानदारांचे आधार कार्ड लावण्याचीही गरज आहे, जेणेकरून व्यवसायात पारदर्शकता राहील आणि कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121