पाकिस्तानात हिंदू युवकाला इस्लाम धर्मांतरणास आणला दबाव, धर्मांतरण न केल्याने युवकावर गोळीबार
31-Mar-2025
Total Views | 26
इस्लामाबाद : पाकिस्तानातील पेशावरमध्ये वय वर्ष ५६ असलेल्या हिंदू सफाई कर्मचाऱ्याला जबरदस्ती धर्मांतर करण्यास सांगितले. त्याने धर्मांतर करण्यास नकार दिल्याने त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. पीडित हिंदूचे नाव नदीम नाथ असून या प्रकरणात मुश्ताक नावाच्या इस्लामी कट्टरपंथीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित प्रकरणाच्या अहवालानुसार, शनिवारी २९ मार्च २०२५ रोजी पेशावरच्या पोस्टल वसाहतीत नदीम आपले काम संपवून घरी परतत असताना हा प्रकार घडला. त्यावेळी मुश्ताक नावाच्या युवकाने नदीमवर गोळीबार करत हल्ला केला होता. त्यानंतर त्याला एका नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नदीमचा भाऊ सागरनाथने संबंधित प्रकरणावर ज्याने गोळीबार केला त्याच्याविरोधात एफआरआय दाखल केली. मुश्ताक मागील २-३ महिन्यांपासून इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यावेळी त्याने याला अनेकदा विरोध दर्शवला होता. सागरने सांगितले की, मुश्ताकने माझ्या भावावर गोळीबार केला. त्याने आम्हाला धर्मांतर करण्याबाबात अनेकदा धमकीही दिली होती. नदीमच्या मित्रांना याबाबत अनेकदा सांगण्यात आले होते तो एका समस्येतून जात आहे. मात्र घरात सर्वात मोठी व्यक्ती असल्याने आणि कर्तबगार असल्याने तो अनेक दिवस या प्रसंगाला तोंड देत होता, त्याचे कारण एवढंच होते की, तो एक हिंदू होता.
#BREAKING: Minority Hindu Man Meena Nath killed by an Islamist radical in Peshawar of KPK, Pakistan for refusing to convert to Islam. Over years several Hindu, Sikh & Christian community members have faced pressure and violent attacks by Islamists to convert to Islam in Pakistan. pic.twitter.com/5B7iWqTZOY
याप्रकरणी आता पोलिसांनी दावा केला की, पथकाने मुश्ताकला २४ तासांमध्ये मुश्ताकला चरसुड्डा येथून पकडण्यात आले होते. त्यावेळी SHO ने सांगितले की, त्याने आपल्या गुन्ह्याचा कबुलीनामा दिला आहे. प्रश्न असा आहे की, एका आरोपीला अटक करून असंख्य हिंदूंचं दुखणं कमी होईल का? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, पाकिस्तानात गरीबी आणि आतंकवाद्यांनी थौमान घातलं आहे. अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेवर पूर्णपणे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याप्रकरणी आता धर्मांतरणाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. प्रत्येक वर्षात असंख्य हिंदू युवतींच्या जीवानीशी खेळ खेळला जात आहे. त्याच्यांवर अन्याय, अत्याचार आणि मंदिरं तोडणे, जबरदस्ती इस्लाम धर्म स्वीकारण्यास जबरदस्ती करण्यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे इस्लामी आता अल्पसंख्यांकांविरोधात कट रचून त्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.