अजमेर दर्ग्याकडून वक्फ विधेयकाला पाठिंबा

    31-Mar-2025
Total Views | 37
 
Waqf Bill
 
जयपुर (Waqf Bill) : वक्फच्या कायद्यातील संशोधनासंबंधित मुस्लिमांचा मोठा वर्ग वक्फ कायद्याला पाठिंबा देत आहे. अजमेर दर्ग्याच्या प्रमुखांनी यासंबंधित माहिती दिली आहे. मुस्लिमांऐवजी ख्रिस्ती धर्मियांनीही याचा फायदा होईल तेही याचे समर्थन करतील. या संबंधित आता केरळच्या खासदारांना ख्रिश्चन संघटनेने एक पत्र लिहिले आहे.
ऑल इंडिया मुस्लिम सुफी सज्जादानशीन काउंसिलचे चेअरमन आणि अजमेर दर्ग्याचे प्रमुख सैयद नसीरुद्दीन चिश्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने वक्फसंबंधित उचललेले पाऊल योग्य असल्याचे म्हटले आहे. सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी ईदच्या निमित्त त्यांनी वक्फ संशोधनाला समर्थन दिले. तसेच त्यांनी याबाबत अनेक फायद्यांचा पाढाच वाचून दाखवला आहे.
ते म्हणाले की, विरोध करणे आणि समर्थन करणे हा एक लोकशाहीचा भागच आहे. वक्फ संशोधनात बदल करणे गरजेचे आहे असे मला तरी वाटते. वक्फ कायद्यामुळे मशि‍दींवर कब्जा केला जाईल, कब्रस्तान काढून टाकण्यात येतील...सरकारला याबाबत घाई नाही. काही बाबींचा विचार करूणच सरकारने विधेयक आणण्याचा विचार केला आहे. 
 
 
ते म्हणाले, "निषेध आणि पाठिंबा हा लोकशाहीचा भाग आहे. माझ्या मते, वक्फमध्ये बदलाची गरज आहे. वक्फ कायद्यामुळे मशिदी आणि कब्रस्तान काढून टाकले जातील असे त्यांचे म्हणणे चुकीचे आहे... सरकारला घाई नाही. सरकारने हे विधेयक सहजतेने आणले होते. सरकारने ते जेपीसीला दिले होते."
ते पुढे म्हणाले, या जेपीसीने सर्वांचे म्हणणे ऐकले आहे, आता ते सादर केले जाईल. मला खात्री आहे की, हे विधेयक आल्यानंतर वक्फ प्रकरणात पारदर्शकता तयार होईल. यामुळे वक्फ मालमत्तांच्या भाड्यात वाढ होईल, याचा फायदा समजासाठी उपयुक्त असणार आहे.
नसीरुद्दीन चिश्ती म्हणाले की, वक्फबाबत लोकांची दिशाभूल केली जात आहे. ते म्हणाले की, सरकार वक्फच्या बाबतील हस्तक्षेप करत नाही तर त्यांचे व्यवस्थापन मजबूत करण्यात येणार आहे, तसेच नरेंद्र मोदींनी त्यांना दिलेल्या भेटवस्तूंचे त्यांनी आभार मानले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121