लव्ह जिहाद : पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तीन वेळा केले गर्भवती; नंतर उपवास धरणे, गोमांस खाण्यास आणला दबाव

    30-Mar-2025
Total Views | 154
 
 
love jihad
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
 
अहवालानुसार, बस्ती जिल्ह्यातील वाल्टरगंज ठाणे क्षेत्रातील पीडिता आपल्या घरी अहमद राजाला ड्रायव्हर म्हणूनच ओळखत होती. जमदाशाहीस्थित असलेला अहमद तिच्यासोबत दररोज छेडछाड करत होता.समाजाच्या भितीने तिने आपल्या सर्व समस्या पदराआड झाकून ठेवल्या होत्या. मात्र, फेब्रुवारी २०२४ मध्ये अहमद चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. यावेळी तिने त्याला पोलिसात तक्रार दाखल करेन असे सांगितले होते. त्यानंतर अहमदने मी तुझ्यासोबत विवाह करेन, असे वचन दिले होते. त्यानंतर काही नातेवाईकांना या विवाहास अमान्यता दिली होती. त्यानंतर अहमद तिला घेऊन पळून निघून गेला. त्यावेळी तिने आपल्यासोबत दोन सोन्याचे हार, तीन सोन्याच्या साखळ्या, एक लाख रुपये, चार चाकी वाहन, वॉशिंग मशीनही घेवून गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
अहमदने तिला अनेकदा आपल्या नातेवाईकांकडे घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने भाडेतत्वावर घर घेऊन तो आणि पत्नी दोघेही स्थिरावले गेले. त्यानंतर विवाहच्या विषयावर अहमद अगदी चिडीचुप होता. त्यानंतर त्यांनी विवाह केला आणि आयुष्यात आनंद यावा असे तिला वाटत होते. मात्र, तिच्या वाटेला दु:ख आले. पीडितेचा आरोप आहे की, अहमदच्या आई-वडील, बहीण आणि मोमिना व फातिमा यांनी पीडितेला नमाज अदा करा, गोमांस खा, रमजानमध्ये उपवास कर, असे सांगितले असता तिने सपशेल याला नकार दिला. तेव्हा अहमदच्या कुटुंबीयांनी तिला अनेकदा गोळ्या खाण्यास दिल्या आणि मारपीट करण्यात आली होती. ज्यावेळी त्यांनी आणलेल्या सर्व वस्तू कुटुंबीयांना देण्यात आल्या होत्या. तर ३५ हजारांसाठी स्कूटी गहाण ठेवण्यात आली होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी की, पीडितेने एक वेळा नाहीतर तब्बत तीन वेळा गर्भपात केला असल्याची माहिती आहे.
 
पीडित युवतीने हिंमत दाखवत वाल्टरगंज ठाण्यात तक्रार दाखल केली. डीएसपी सत्येंद्र भूषण तिवारीने सांगितले की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर अहमदला पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121