भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात भाजपाचे सरचिटणीस अरुण सिंह, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आज सकाळी दाखल झाले. त्यानंतर प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ठाणे विभाग स्तरावर झालेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या वेळी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीबाबत विविध सूचना देण्यात आल्या. या वेळी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक, निवडणूक अधिकारी चैनसुख संचेती, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. वाघुले यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर दिवसभर झालेल्या आढावा बैठकीला पक्षाचे ठाणे विभागातील सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती.