स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात तीन नवीन गुन्हे दाखल
29-Mar-2025
Total Views | 48
नवी दिल्ली (Kunal Kamra) : स्टँडअप कॉमेडियन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली वाटेल ती गरळ ओकत आहेत. मागे काही दिवसाआंधी रणवीर अलाहाबादियाने खालच्या पातळीचे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कमराने सध्याच्या राज्य सरकारवर आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर एका कवितेच्या माध्यमातून विडंबन पद्धतीचा वापर चांगलंच टोकलं आहे. यामुळेछ आता कुणाल कामरा हा चांगलाच गोत्यात आला आहे.
कुणाल कामराविरूद्ध ३ नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई नाशिकमध्ये त्याच्यावर एफआऱआय दाखल करण्यात आला आहे. कामरा यांना अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर त्यांच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्राटचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरूद्ध करण्यात आलेल्या अवमानावरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच जळगावच्या महापौरांनी एक तर तर नाशिकमध्ये दोन व्यवसायिकांनी दोन तक्रारी दाखल केल्या आहेत.
खरंतर आता खार पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोनदा पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते, पण तो हजर झाला नाही. अशातच कुणालला मद्रास उच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्ण जामीन मंजूर करून दिला होता. मात्र त्यावेळी न्यायालयाने एक अट घातली होती की, त्याला तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील वानूरच्या न्यायिक दंडाधिकाऱ्यांसमोर जामीन भारावा लागेल. यासोबतच न्यायालयाने खार पोलिसांना नोटीस जारी करण्यात आली होती.
राज्याऐवजी आता तमिळनाडूच्या मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करताना, कामरा यांनी असा युक्तीवाद केला की, ते २०२१ मध्ये मुंबईहून तामिळनाडूला गेले. मग ते या राज्यातील सामान्य राहिवासी आहेत. त्यामुळे त्याला भीती आहे की, मुंबई पोलीस त्याला अटक करू शकतात, या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायालयात ७ एप्रिल रोजी करणार आहे.