‘म्हाडा’त सुनावणी झाल्यानंतर ७ दिवसांत आदेश निर्गमित करा!

    29-Mar-2025
Total Views | 11
 
MHADA
 
 
मुंबई : ( MHADA ) “कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने विविध प्रकरणांवर अपील अंतर्गत ‘महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’चे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घेतल्या जाणार्‍या सुनावण्यांमध्ये निर्णय झाल्यानंतर संबंधित आदेश सात दिवसांच्या आत निर्गमित करावेत,” असे स्पष्ट निर्देश ’म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.
 
’उपाध्यक्ष यांच्या दालनात ‘विकास नियंत्रण नियमावली ३३ (७)’, ‘बृहतसूची (मास्टर लिस्ट)’, ‘म्हाडा’ संगणकीय सोडत व इतर विषयांवरील अपील सुनावण्या घेतल्या जातात. मात्र, या सुनावण्यांवरील आदेश निर्गमित होण्यासाठी एक महिना, दोन महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असल्याचे आढळून आल्याने जयस्वाल यांनी हा कालावधी सात दिवसांवर मर्यादित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच, हा निर्णय ‘म्हाडा’च्या विभागीय मंडळांतील मुख्य अधिकारी व इतर विभाग प्रमुखांच्या स्तरावर घेण्यात येणार्‍या सुनावणींकरितादेखील लागू करण्यात यावेत, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
संतमय वातावरणात पंढरपूरची

संतमय वातावरणात पंढरपूरची 'वारी' या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न!

पंढरीची 'वारी' म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा आनंदोत्सव. वर्षभराची ऊर्जा देणारा आनंदसोहळा म्हणून पंढरीच्या वारीकडे पाहिलं जातं. महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेली ही पंढरपूरची ‘वारी’ आता मराठी चित्रपटरूपाने आपल्या भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त संपन्न झाला. मा. आमदार किसन कथोरे यांनी विधीवत पूजा करून या चित्रपटाला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता प्रसाद ओक, वैभव मांगले, गणेश यादव, प्रणव रावराणे या दिग्गज कलाकारांच्या साथीने ‘वारी’ चा हा प्रवास आपल्याला घडणार आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121