बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही - आनंद तेलतुंबडे

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ परिसंवादामध्ये अपमान

    29-Mar-2025
Total Views |
 
 
Anand Teltumbde
 
 
मुंबई : “मूलभूत अधिकार संघर्ष समिती’तर्फे ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ पत्रकार भवन येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या विषयावर आनंद तेलतुंबडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. बुद्धांनी जातिप्रथेला विरोध केला. पण, बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही,” असे वक्तव्य आनंद तेलतुंबडे यांनी केले. यावेळी श्रोत्यांमध्ये ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, अल्हाद पाटील, कल्पना हजारे आदी समविचारी लोक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात ते फिरकलेच नाहीत. 
 
तुमच्या भावना दुखावल्या
तर ‘गो टू हेल’
 
आनंद तेलतुंबडे यांच्या व्याख्यानानंतर प्रश्न विचारू दिला नाही. मात्र, कार्यक्रमानंतर पत्रकार योगिता साळवी यांनी तेलतुंबडे यांना व्याख्यानातील विधानाबाबत प्रश्न विचाारले. पण, आयोजक प्रश्न विचारू देत नव्हते. यावर तेलतुंबडे यांना गाठत प्रश्न विचारला की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ. बाबासाहेबांचा छळ करत होता, शिवीगाळ करत होता असे तुम्ही म्हणालात; पण आमचे डॉ. बाबासाहेब शेर होते, निडर होते. त्यांना डिवचणार्‍यांना ते कधीच सोडत नसत, मग संघाने इतका त्रास दिल्यावर, शिवीगाळ केल्यावर ते का बोलले नाहीत? काही बोलले असतील तर कुठे लिहिलेले आहे का?” असा प्रश्न केला. यावर तेलतुंबडे यांनी, “डॉ. बाबासाहेब गेल्यावर त्यांनी शिवीगाळ केली,” असे उत्तर दिले. पुढे योगिता साळवी यांनी तेलतुंबडेंना विचारले की, “तुम्ही म्हणालात बुद्धांनी जातीनिर्मूलनासाठी काम केलेच नाही? असे कसे म्हणू शकता? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत बुद्धांचा धम्म स्वीकारला. तुम्ही तथागतांचा अपमान करता, आमच्या भावना दुखावता.” यावर तेलतुबंडे यांनी उत्तर दिले की, “तुमच्या भावना दुखावतात ‘गो टू हेल’.” दरम्यान, यावर “मुली-महिलांशी असे वागणारे हे असे विचारवंत ‘यु गो टू हेल” असे योगिता साळवी यांनी सांगितले. मात्र, यावेळी उपस्थित असलेले लोक योगिता यांना बोलताना थांबवत होते, प्रश्न विचारू देत नव्हते, असे दिसून आले आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लहानपणीच्या आठवणीतला

लहानपणीच्या आठवणीतला 'बॅटमॅन' हरपला; अभिनेते वॅल किल्मर यांचे 'या' आजाराने निधन!

हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते वॅल किल्मर यांचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. 'टॉप गन' आणि 'बॅटमॅन फॉरएव्हर' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे किल्मर लॉस एंजेलिसमध्ये मंगळवारी न्यूमोनियामुळे निधन पावले, अशी माहिती त्यांच्या मुलीने, मर्सिडीज किल्मरने दिली. २०१४ मध्ये त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते, मात्र त्यानंतर ते बरे झाले होते. परंतु, ट्रॅकिओटोमी शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आवाज पूर्णपणे बदलला आणि त्यांचा अभिनय प्रवासही मर्यादित झाला. तरीही, २०२२ मध्ये आलेल्या 'टॉप ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121