मुंबई: ( block on Central Railway to remove girder ) कल्याण आणि बदलापूर दरम्यानच्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिजच्या गर्डर्सचे डी-लॉन्चिंग करण्यासाठी शनिवार, दि. २९ व रविवार, दि. ३० रोजी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
मध्य रेल्वे, मुंबई विभाग, कल्याण आणि बदलापूर दरम्यान नवीन पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी अप आणि डाऊन मार्गांवर ६२ आणि ८८० किमीवर असलेल्या विद्यमान रोड ओव्हर ब्रिज (आरओबी)च्या चार गर्डर्सच्या डी-लॉन्चिंगसाठी दोन रोड क्रेनचा वापर करून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री १.३० वाजता ते रविवार रोजी पहाटे ४,३० वाजता अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान घेण्यात येईल.
उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक
ब्लॉक कालावधीत अंबरनाथ आणि कर्जत स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. परळ येथून ११.१३ वाजता सुटणारी (पीए3) परळ-अंबरनाथ लोकल बदलापूरपर्यंत चालवण्यासाठी वाढवली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ११.५१ वाजता सुटणारी (बीएल61) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-बदलापूर लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ००.१२ वाजता सुटणारी (एस1) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कर्जत लोकल अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल. कर्जत येथून २.३० वाजता सुटणारी (एस2) कर्जत-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल अंबरनाथ येथून शॉर्ट ओरीजनेट केली जाईल आणि अंबरनाथ येथून ३.१० वाजता सुटेल.
कर्जत-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष लोकल कर्जत येथून ४.१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ६.०८ वाजता पोहोचेल.अप मेल/एक्सप्रेस गाड्या या ब्लॉक काळात भुवनेश्वर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस, विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, हैदराबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसेनसागर एक्सप्रेस, होसपेट-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस आणि चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळविण्यात येतील.
कल्याण येथे जाणार्या प्रवाशांच्या फायद्यासाठी कल्याणला नियोजित थांबा असलेल्या गाड्यांना ठाणे येथे थांबा देण्यात येईल. अप मेल/एक्सप्रेस गाड्या ट्रेन क्रमांक २२१७८ सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस ४.१० ते ४.३० वाजेपर्यंत वांगणी स्थानकावर नियंत्रित केली जाईल. ट्रेन क्रमांक ११०२२ तिरुनेलवेली-दादर एक्सप्रेस ४.१७ ते ४.२७ वाजेपर्यंत नेरळ स्थानकावर नियंत्रित केली जाईल.