मनोर-पालघर, जव्हार-मनोर मार्गाचा विस्तार करा : खासदार सवरा

केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी

    27-Mar-2025
Total Views | 12
 
MP Savra meets minister gadkari for road demand
 
वाडा: ( MP Savra meets minister gadkari for road demand ) “अर्धकुंभ मेळा २०२७ नाशिक या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोर-पालघर आणि जव्हार-मनोर या महामार्गांच्या दुरुस्ती व विस्तारासाठी तातडीने निधी मंजूर करा,” अशी मागणी खा. डॉ. हेमंत सवरा यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
 
अर्धकुंभ मेळा हा लाखो भक्त, पर्यटक आणि साधू-संतांचे केंद्रबिंदू असलेला ऐतिहासिक सोहळा आहे. यामुळे नाशिककडे जाणार्‍या विविध मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यातील हा महामार्ग धार्मिक, व्यापारी आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने त्याचा विकास अत्यावश्यक आहे. सध्या या महामार्गांची परिस्थिती अत्यंत खराब असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
 
अपघातांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांना व वाहनचालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खा. डॉ. सवरा यांनी या मार्गाच्या दुरुस्ती व चौपदरीकरणासाठी आवश्यक निधी तत्काळ मंजूर करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती खा. सवरा यांनी दिली.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
ईदच्या मुहूर्तावर सलमान नाराज; सिकंदर बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडण्यात अपयशी!

ईदच्या मुहूर्तावर सलमान नाराज; सिकंदर बॉक्स ऑफिसवर प्रभाव पाडण्यात अपयशी!

सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या सिकंदर चित्रपटाने ३० मार्चपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सुरुवात केली. ए. आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी चित्रपटाचे कौतुक केले असले तरी काहींनी त्यावर टीका केली आहे. सलमान आणि रश्मिकाच्या अभिनयासह चित्रपटाच्या कथानकावरही काही प्रेक्षक नाराज असल्याचे दिसते. मात्र, तरीही पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली आहे? जाणून घेऊया...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121