काश्मीरचे खोरे भारताशी जोडले जाणार, रेल्वे मार्गाने होणार शक्य
27-Mar-2025
Total Views | 6
जम्मू-काश्मीर (Vande Bharat Railway) : भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जम्मू काश्मीरपर्यंत पोहोचण्यासाठी वंदे भारत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. एप्रिल २०२५ मध्ये काश्मीर खोऱ्यात रेल्वेची सुविधा करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. देशातील आतापर्यंतचा हा सर्वात महत्त्वाचा आणि कठीण प्रकल्प पूर्ण करण्यात आला आणि तो इतर भागांशी जोडला गेलेला आहे. जम्मू काश्मीरला जाणारी पहिली वहिली रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस असेल अशी माहिती समोर आली आहे.
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, १९ एप्रिल २०२५ रोजी पंतप्रधान मोदी कटरा ते श्रीनगर या पहिल्या रेल्वेत हिरवा झेंडा दाखवू शकतात. हा कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमध्येच होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवण्यासोबतच, पंतप्रधान मोदी चिनाब पुलाला भेट देणार आहेत. ज्याद्वारे हा रेल्वेमार्ग जोडला जाणार आहे.
संबंधित रेल्वे पूल हा या मार्गाचा जगातिल सर्वात उंच पूल असून या रेल्वे मार्गाचा मुख्य दुवा आहे. या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच रॅलीलाही संबोधित केल्याचे वृत्त आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सुरूवातीला ही ट्रेन कटरा आणि श्रीनगरदरम्यान, धावणार असे अहवालात म्हटले आहे. तथापि, लवकरच ही रेल्वे जम्मू आणि श्रीनगर दरम्यानही धावणार आहे. या मार्गावर प्रथम वंदे भारत एक्सप्रेस चालवली जाईल असे सांगितले जात आहे. दिल्ली ते श्रीनगर थेट रेल्वे सेवानंतर सुरू होऊ शकते.
याआधीही काश्मीरात बनिहाल ते बारामुल्ला दरम्यान रेल्वेचे जाळे होते. श्रीनगरमध्ये हे या मार्गाचा एक भाग आहे, आता बनिहाल कटराशी जोडले गेले आहे. हा मार्ग १११ किलोमीटर लांबीचा आहे. यात बोगदे आणि पुलांच्या मदतीने १०४ यापूर्वी काश्मीरमधील बनिहाल ते बारामुल्ला अशी ट्रेन चालवण्यात येत होती. श्रीनगर हे या मार्गाचा एक भाग आहे. आता बनिहाल कटराशी जोडले गेले आहे. हा मार्ग १११ किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये बोगदे आणि पुलांच्या मदतीने १०४ किमीचा रस्ता बांधण्यात आला आहे.
काश्मीरला जम्मूसोबत जोडण्याचा हा एक प्रकल्प मोदी सरकारच्या काळात पूर्ण करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील या संपूर्ण प्रकल्पाला USBRL असे नाव देण्यात आले आहे. याचाच अर्थ असा की, उधमपूर-श्रीगनर-बारामुल्ला रेल्वे मार्ग आणि या प्रकल्पावर अंदाजे ४१ हजार कोटी खर्च झाले आहेत.
कोकण रेल्वे आणि इकॉनसारख्या एजन्सींना या प्रकल्पाच्या बांधकामात गुंतवून ठेवण्यात आले. रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी, पंतप्रधान मोदींनी जम्मू आणि काश्मीरचा रेल्वे विभागही वेगळा करण्यात आला आहे. आताच जम्मू देखील एक रेल्वे विभाग बनला असून पूर्वी तो फिरोजुपूरमधून नियंत्रित केला गेला जात होता.
मोदी सरकारच्या काळात, केवळ काश्मीरच नाही तर ईशान्य भारताला रेल्वेने जोडण्यात आलेले आहे. २०१४ मध्ये मेघालय, २०२१ मध्ये मणिपूर रेल्वेला भारताशी जोडण्यात आले आहे. २०२५ मध्ये मिझोरमची राजधानी ऐझॉल देखील रेल्वेने जोडली जाणार आहे. ईशान्यकडील उर्वरित राज्यांमध्ये, मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे.