मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Hijab on Eiffel tower) डच मुस्लिम ब्रँड 'मेराकी' फ्रान्समध्ये आपले दुकान उघडण्याच्या तयारीत आहेत. मात्र त्यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी केलेली जाहिरात चांगलीच वादात सापडली आहे. त्या जाहिरातीत आयफेल टॉवरला मुस्लिम पोषाख आणि हिजाब घालण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आहे. या जाहिरातीमुळे फ्रान्समधील राष्ट्रवादी जनतेत संतापाची लाट उसळली असून फ्रान्सच्या संपूर्ण अस्मितेच्या इस्लामीकरणाची ही जाहिरात असल्याचे म्हटले जात आहे.
अशी माहिती आहे की, 'मेराकी' आपले दुकान फ्रांसमध्ये २२ ते ३० मार्च या कालावधीत पॅरिसच्या मराइस जिल्ह्यात उघडत आहे. रमजानच्या शेवटच्या आठवड्यात हे होत असल्याने आपल्या जाहिरातीत फ्रांसचे सर्वाच मोठे प्रतिक असलेल्या आयफेल टॉवरला अबाया आणि बुरखा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकारावरून फ्रान्समधील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. कारण आयफेल टॉवर हे त्यांच्या अस्मितेचे प्रतिक आहे. आणि त्याला इस्लामिक कपडे घालणे म्हणजे फ्रान्सच्या संपूर्ण अस्मितेच्या इस्लामीकरणाची ही जाहिरात आहे, अशा तीव्र भावना उमटत आहेत. काही लोकांनी यास राजकीय हल्ला म्हटले असून तो अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे.
वास्तविक 'मेराकी' या ब्रँडची स्थापना २०२० मध्ये मोरोक्कन डच डिझायनर नाडा मेराकी यांनी केली होती. ते महागडे स्कार्फ, बुरखा, हिजाब, अबाया आणि इतर कपडे या ब्रँडच्या अंतर्गत विकतात. संपूर्ण युरोपमधील श्रीमंत मुस्लिम महिलांमध्ये हा ब्रँड खूप लोकप्रिय आहे. परंतु फ्रान्सच्या राष्ट्रवादी नॅशनल रॅली पक्षाच्या खासदार लिसेट पोलेट यांनी ही जाहिरात भडकावणारी आणि फ्रान्सच्या लोकशाही मूल्यांवर तसेच वारशावर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
सांस्कृतिक अस्मितेवर आक्रमण
आयफेल टॉवर ही फ्रान्सची स्वतःची सांस्कृतिक ओळख आहे. आयफेल टॉवरमुळे फ्रान्सची जगभरात ओळख आहे. आणि जेव्हा त्याला धार्मिक अस्मितेशी जोडले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर पूर्णपणे आक्रमण केले जात आहे आणि त्याचे स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतात जेव्हा असंख्य मंदिरे पाडून त्यावर मशिदी बांधल्या गेल्या, तसाच हा प्रयत्न आहे.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक