भारतातील अल्पसंख्यांकांची काळजी करू नका

परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेस सुनावले

    26-Mar-2025
Total Views | 9

परराष्ट्र मंत्रालय
 
नवी दिल्ली : भारतात राहणाऱ्या अल्पसंख्याकांबद्दलच्या यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम (युएससीआयआरएफ ) च्या अहवालाचे भारताने पक्षपाती आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित असे वर्णन केले आहे.
 
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, यूएससीआयआरएफ धार्मिक स्वातंत्र्याबद्दल चिंतित असल्याचे दिसत नाही, परंतु काही घटनांचे चुकीचे वर्णन करून भारताची प्रतिष्ठा खराब करण्याचा प्रयत्न करीत आहे. धार्मिक स्वातंत्र्यासाठी यूएससीआयआरएफची ही खरी चिंता नाही, तर हा एक सुनियोजित अजेंडा आहे. ज्याअंतर्गत भारताची एक चैतन्यशील बहुसांस्कृतिक समाज म्हणून प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
 
रणधीर जयस्वाल म्हणाले की, लोकशाही आणि सहिष्णुतेचे प्रतीक म्हणून भारताची प्रतिष्ठा खराब करण्यात अशा प्रयत्नांना यश येणार नाही. ते पुढे म्हणाले की, भारताविषयी प्रयूएससीआयआरएफला काळजी करण्याची गरज नाही. भारताची लोकसंख्या १४० कोटी आहे, जे वेगवेगळ्या धर्मांचे पालन करतात. तथापि, आम्हाला अशी अपेक्षा नाही की यूएससीआयआरएफ कधीही हे मान्य करेल किंवा दाखवण्याचा प्रयत्न करेल की भारतात विविध धर्म, जाती, समुदाय आणि संस्कृतीचे लोक एकोप्याने एकत्र राहतात. त्यामुळे यूएससीआयआरएफ हा चिंतेचा विषय असल्याचे जयस्वाल यांनी म्हटले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121