मंत्री जयकुमार गोरेंना अडकावण्यात सुप्रिया सुळे, रोहित पवारांचा हात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

    26-Mar-2025
Total Views | 17
 
Chief Minister Devendra Fadnavis in vidhansabha on jaykumar gore case
 
 
मुंबई: ( Chief Minister Devendra Fadnavis in vidhansabha on jaykumar gore case ) मंत्री जयकुमार गोरे यांना अडकावण्यात शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे आणि आ. रोहित पवार यांचा हात आहे. गोरे यांच्याविरोधात तयार केलेले व्हिडिओ आरोपींनी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले असून त्या तिघांमध्ये अनेक फोन कॉल झाल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, दि. २५ मार्च रोजी विधानसभेत केला. अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “राजकारण करताना कुणाला जीवनातून उठवण्याचा हेतूने राजकारण होत असल्यास ते योग्य नाही. २०१६ मध्ये मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भातील केस दाखल झाली आणि ती २०१९ साली संपली. तेव्हा ते आमच्या सोबतही नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढण्यात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्याला जाऊन तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. त्यावेळी सगळे संभाषण टेप करण्यात आले. त्यानंतर सापळा रचून पैसे घेताना आरोपीला अटक करण्यात आली. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार होता.
 
या प्रकरणात संबंधित महिला, तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांना अटक झाली आहे. या सगळ्यांनी मिळून जो कट रचला, त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक यांच्याशी थेट संपर्कात होते. प्रभाकरराव देशमुख हे या तिन्ही आरोपींशी १०० वेळा बोलले आहेत. पण त्याहीपेक्षा सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे तुषार खरात यांना कॉल झालेत. तुषार खरात यांनी जयकुमार गोरेंविरोधात तयार केलेले व्हिडिओ सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल. आपण राजकीय शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहोत.
 
त्यामुळे अशा प्रकारे कुणाला जीवनातून उठवून टाकण्याचा प्रयत्न होत असल्यास ते चुकीचे आहे. तुषार खरात नावाचा कथित युट्यूबर आणि काही लोकांचे ‘नेक्सस’ यामध्ये पाहायला मिळाले. या प्रकरणातील महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातली आहे, अशा प्रकारचा खोटा प्रचार करण्यात आला. त्या विरोधातही तक्रार करण्यात आली,” अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121