"कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती..."; काय म्हणाले प्रशांत कोरटकरचे वकील?
25-Mar-2025
Total Views | 46
1
कोल्हापूर : (Prashant Koratkar Hearing) शिवछत्रपती अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज दि. २५ मार्च रोजी सुनावणासाठी कोल्हापूर न्यायालयात हजर करण्यात आले आहे. यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील असीम सरोदे हे कोल्हापूर न्यायालयात हजर झाले आहेत. या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली असून आरोपीच्या वकीलांनी युक्तिवाद करताना कोरटकरच्या अटकेची गरज नसल्याचे म्हटले आहे.
प्रशांत कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती...
प्रशांत कोरटकरला अटक करण्याची गरज नव्हती, असा युक्तिवाद आरोपीच्या वकीलांनी सुनावणीदरम्यान केला आहे. कोरटकरचे वकील घाग व्हि़डिओ कॅान्फरन्सिंगच्या माध्यमातून बाजू मांडण्यासाठी उपस्थित आहेत. प्रशांत कोरटकरवर लावलेल्या कलमांनुसार अटकेची गरज नव्हती, असे वकील घाग यांनी म्हटले आहे. कोरटकरच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काही दाखले देऊन त्याला अटक करण्याची गरज नसल्याचा प्रशांत कोरटकरच्या वकिलांनी केला आहे.
सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
दुसरीकडे राजमाता जिजाऊंवर शिंतोंडे उडवले हा गंभीर गुन्हा आहे, असे अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी युक्तिवाद करताना म्हटले आहे. प्रशांत कोरटकरची विधानं गंभीर, त्यामुळे आवाजाचे नमुने आम्हाला घ्यायचे आहेत. तसेच तो महिनाभर फरार होता त्यामुळे त्याची चौकशी करायची आहे. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी केली आहे.