आता मिळवा घर बसल्या ई-मुद्रांक प्रमाणपत्र! जाणून घ्या काय आहेत बदल?

    25-Mar-2025
Total Views | 13

 e-stamp certificate Know what are the new update Chandrashekhar Bawankule 
 
मुंबई : ( e-stamp certificate Know what are the new update Chandrashekhar Bawankule ) राज्य सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी प्रक्रियेत आमूलाग्र बदल केले आहेत. आता नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन ई-मुद्रांक प्रमाणपत्र मिळवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचे महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत मांडले. सोमवार, दि. २४ मार्च रोजी त्याला मंजुरी देण्यात आली.
 
विधेयकाबाबत सांगताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, २००४ पासून सुरु असलेल्या जुन्या प्रक्रियेमध्ये नागरिकांना स्टॅम्प पेपरसाठी विक्रेत्याकडे जावे लागत होते. त्याला मर्यादा होती. फ्रँकिंगसाठी वेगळ्या केंद्रांवर जावे लागत होते आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान ई-चलन भरल्यानंतरही त्याची प्रिंट काढून कार्यालयात सादर करावी लागत होती. या सर्व बाबींना सरकारने आता पूर्णविराम दिला आहे.
 
स्टॅम्प शुल्क किती लागणार याबाबत नागरिकांमध्ये मोठा गोंधळ असतो. त्यावर तोडगा काढत सरकारने अभिनिर्णय प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. एखाद्या दस्तऐवजावर स्टॅम्प शुल्क किती लागेल हे कळण्यासाठी अर्ज केल्यास, तो कोऱ्या कागदावर न करता, थेट १ हजार रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करावा लागेल. जर स्टॅम्प शुल्क जास्त भरले गेले, तर ४५ दिवसांत पैसे परत मिळतील. कमी भरले गेले तर त्वरित भरावे लागतील.
 
नवीन विधेयकातील महत्त्वाच्या बाबी
 
• आता कुठेही, कधीही ऑनलाइन स्टॅम्प शुल्क भरता येईल
 
• ई-मुद्रांक प्रमाणपत्र त्वरित मिळणार – कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही
 
• ५०० रुपये शुल्क कायम – कोणताही अतिरिक्त भार नाही
 
• स्टॅम्प पेपर विकत घेण्याचा पर्याय उघडाच राहणार – कुणावरही सक्ती नाही
अग्रलेख
जरुर वाचा
सोनी मराठी वाहिनी सादर करीत आहे कीर्तनावर आधारित भारताचा पहिला रिअ‍ॅलिटी शो; मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले वीणेच्या आकारातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण…!

सोनी मराठी वाहिनी सादर करीत आहे कीर्तनावर आधारित भारताचा पहिला रिअ‍ॅलिटी शो; मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी केले वीणेच्या आकारातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण…!

'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या भारतातील पहिल्या रिअॅलिटी शोची घोषणा करत सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्राच्या कीर्तन परंपरेला या शोच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमधून १०८ सहभागींसह, सुरु होणारा हा शो महाराष्ट्राचा धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक असा अनमोल ठेवा अभिमानाने रसिकांसमोर आणणार आहे. 'कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार' या रिअ‍ॅलिटी शोचा शुभारंभ आणि पु.ना. गाडगीळ यांनी हस्तनिर्मित केलेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीच्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण ..