"आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारात सहभागी..."; दिशा सालियान प्रकरणी वकील निलेश ओझा यांचा गौप्यस्फोट
25-Mar-2025
Total Views | 85
मुंबई : (Disha Salian Case) दिशा सालियनचे वडील सतीश सालियन (Satish Salian)आणि त्यांचे वकील निलेश ओझा (Nilesh Ojha) यांनी मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांची भेट घेतली आहे.सतीश सालियन यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांनी दिशा सालियन हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. दरम्यान, सतीश सालियन आणि वकील निलेश ओझा यांनी ही तक्रार केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारात सहभागी - वकील निलेश ओझा
वकील निलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्सच्या व्यापारात सहभाग असल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला आहे. तसेच दिनो मौर्य आणि आदित्य ठाकरे यांचे संभाषण झाल्याचा दावा ओझा यांनी केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती देताना निलेश ओझा म्हणाले आहेत की, "याआधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा एखाद्या गुन्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग असतो तेव्हा अश्या प्रकारे लिखित तक्रार अर्ज करावा लागतो. ती तक्रारच एफआयआर असते. म्हणूनच आम्ही आज मुंबईचे गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्याकडे ही लिखित तक्रार दिलेली आहे. त्यांनी अर्ज स्वीकारला असून आता आमच्याकडून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता पुढची जबाबदारी पोलिसांची आहे. आता पोलीस आरोपींवर कधी कारवाई करतात हे पाहावं लागेल.”