डोंबिवली: ( Trivar Jaijayakar Rama programe organized in Dombivli ) एकलव्य आर्ट फोरम कथक नृत्य संस्था, श्री कला संस्कार न्यास आणि मधुकर चक्रदेव एचयुएफ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रामनवमीचे औचित्य साधून बाबूजी आणि ग.दि. मा. यांच्या गीतरामायणाला ७० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ‘त्रिवार जयजयकार रामा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 4 एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सावित्रीबाई फुले नाटयगृहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात १५ दिग्गज नृत्यसंस्थांचे एकूण २५० कलाकार सहभागी होणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे फक्त भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीद्वारे नृत्यशैली द्वारे निवडक नृत्य गीतरामायणातून श्रीराम चरणी लीन होणारा हा सोहळा असणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाची जागतिक विक्रमात नोंद होणार आहे अशी माहिती कथक नृत्य संशोधक सुनिला पोतदार यांनी दिली.
या कार्यक्रमाची मूळ संकल्पना एकलव्य आर्ट फोरम च्या संस्थापिका संचालिका सुनिला पोतदार यांची आहे. गीतरामायणाला सत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांचे काहीतरी वेगळे स्वरूप द्याचे असा विचार केला होता. केवळ श्रीरामाच्या नृत्यातून जागतिक विक्रम नोंदवू शकतो असा विश्वास पुढच्या पिढीला देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कलाकार या कार्यक्रमासाठी मेहनत घेत आहे. या कार्यक्रमात पहिल्या नृत्यापासून शेवटर्पयत भारतीय नृत्य शैलीचा हात धरून ठेवला आहे. नृत्यातून आतार्पयत अश्याप्रकाराचा कार्यक्रम करण्यात आलेला नाही.
त्यामुळे हा कार्यक्रम जागतिक विक्रम नोंदविणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गायक आणि संगीतकार वसंत आजगावकर उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेला एकलव्य संस्थेच्या संचालिका सुनिला पोतदार, श्रीकला संस्कार न्यास संस्थेच्या अध्यक्षा ज्योती दाते बेहरे, मधुकर चक्रदेव एचयुएफ संस्थेच्या अंजली चक्रदेव आदी पदाधिकारी आणि कलाकार उपस्थित होते.
डोंबिवलीतील १५ संस्थांचा सहभाग
या कार्यक्रमात एकलव्य आर्ट फोरम, मंजिरी नृत्यकला मंदिर, विशाखा नृत्यालय, चिदंबरम डान्स अकादमी, नटश्री नृत्यालय, पुरस्कार डान्स अकादमी, पवित्र आर्ट व्हीजुयल इन्स्टिटयूट, सिध्दी नृत्यकला मंदिर, शिवगौरी नृत्यालय, नृत्यम संस्था, श्रीमुद्रा कला निकेतन, लहजा आर्ट फाऊंडेशन, समर्पण कथक कला मंदिर, आवर्तन कथक कला केंद्र, आंगिकम नृत्य संस्था.