आदित्य ठाकरेंकडून कामराची पाठराखण, "... मग मलिष्काचं गाणं तुम्हाला का झोंबलं होतं"
24-Mar-2025
Total Views | 19
मुंबई :(Manisha Kayande on Aaditya Thackeray) स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामरा प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले आहेत. दरम्यान, कुणाल कामरावर कारवाई होणार असल्याने विरोधकांनीही याप्रकरणी कुणाल कामराची पाठराखण करत आक्रमक भूमिका घेतली. उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना स्टँडअप कॅामेडिअन कुणाल कामराची पाठराखण केल्यानंतर शिवसेनेच्या महिला प्रवक्त्या डॅा. मनीषा कायंदे यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
"रिक्षावाला माणूस मुख्यमंत्री झाला हे त्यांच्या पचनी पडत नाही"
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराचं समर्थन केल्याचं विचारल्यावर मनीषा कायंदे म्हणाल्या, “सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना रिक्षावाला मुख्यमंत्री बनल्याचं पाहवत नाहीये. शेतकऱ्याचा मुलगा रिक्षावाला माणूस मुख्यमंत्री झाला हे त्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे कोणीतरी कॉमेडियन तयार करून बोलायला लावायचं. उद्या आम्हीही त्यांच्या घरात जाऊन अशाच शिव्या देतो आणि मग संविधान दाखवतो."
"मागे मलिष्काने गाणं केलं होतं तेव्हा तुम्हाला का झोंबलं होतं? तेव्हा मिर्च्या का लागल्या"
आदित्य ठाकरेंनी कुणाल कामराची बाजू घेत त्याने कोणाचेही नाव घेतलेले नसताना त्याच्यावर कारवाई का व्हावी, असा प्रश्न विचारला आहे. यावर मनीषा कायंदे यांनी आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न विचारत टीका केली आहे. त्या म्हणाल्या आहेत, "मागे मलिष्काने गाणं केलं होतं तेव्हा तुम्हाला का झोंबलं होतं? तेव्हा मिर्च्या का लागल्या. कंगना राणावत हिचे घर तोडलं होतं, ते का तोडलं होतं? याचं उत्तर द्यावं. कुणाल भामट्यामागे तुम्हीच आहात याचा तुम्हीच पुरावा देत आहात.”