कोकणात मच्छिमारांसाठी मागेल त्याला तलाव योजना आणणार का?

भाजपा आ. प्रविण दरेकरांचा मत्स्य मंत्री नितेश राणेंना सवाल

    24-Mar-2025
Total Views | 8

government bring a lake plan for fishermen in Konkan pravin darekar
 
मुंबई - ( government bring a lake plan for fishermen in Konkan pravin darekar ) कोकणात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. पर्यटनसोबत कोकणच्या आर्थिक विकासाला मासेमारीतून मोठा उपयोग होणार आहे. ज्याप्रमाणे सरकार मागेल त्याला शेततळे देते त्याप्रमाणे कोकणात मच्छिमारांसाठी मागेल त्याला तलाव ही योजना आणणार का? असा सवाल भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकर यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांना विचारला.
 
दरेकर म्हणाले कि, गोंदिया जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय वाढीसाठी उपाययोजना करण्याचा विषय आहे. तेथील तलावं प्राधान्याने वेगवेगळ्या मच्छिमार संस्थांना दिलेत. बरेचसे चालू-बंद असून कुणी पोटभाड्याने चालवायला दिलेत. या सर्व गोष्टींचा सर्वकष आढावा घ्यावा. कारण आपल्या राज्यात मच्छिमारीला प्रचंड महत्व आहे. कोकणात पर्यटनासोबत आर्थिक विकासाला मासेमारीतून मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे. मासेमारीला प्रोत्साहन दिले तर कोकणच्या आर्थिक विकासाला आणि तेथील स्थानिक मच्छिमारांना मोठा दिलासा मिळेल. कोकणात मासेमारीसाठी तलावं ठराविक ठिकाणी आहेत. कोकणात तलावांच्या निर्मितीची मोहीम करावी. जसे मागेल त्याला शेत तळे देतो तसे मागेल त्याला मच्छिमारीसाठी तलाव अशा प्रकारची योजना आणणार का? असा प्रश्न उपस्थित केला.
 
दरेकरांच्या प्रश्नावर उत्तर देताना मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे म्हणाले कि, मच्छिमारीत देशात आपण ११ व्या क्रमांकावर आहोत. राज्याच्या मच्छिमारीला कृषिचा दर्जा देण्याचा विचार सरकार करत आहे. जेणेकरून विविध उपाययोजना राबविता येतील, योजना आणता येतील, मच्छिमारांचा खर्च कमी करता येईल. त्या दृष्टिकोनातून दरेकर यांनी कोकणातील तलावांसंदर्भात महत्वाची सूचना केलीय. मत्स्य खात्याला एकही योजना नाही. पण महायुती सरकार आल्यानंतर आमच्या बैठका सुरू आहेत. येणाऱ्या काही वर्षात मत्स्य खात्याच्या स्वतंत्र योजना तयार करणे, मच्छिमारांना मदत करणे, उत्पादन वाढवणे आणि हे वेगवेगळे प्रयोग त्यानिमित्ताने करणे यासाठी आंध्र प्रदेशची मदत घेतोय, अन्य राज्यांशीही चर्चा सुरू आहे. जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यावर भर राहील.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121