‘पोडियम’वरचे निघाले बोहल्यावर...

    24-Mar-2025
Total Views | 10

article introduces the hockey players mandeep singh and udita kaur
 
भारतीय हॉकी संघातील अनेक खेळाडू देशासाठी विजेतेपद जिंकून पदकासाठी कित्येकवेळा ‘पोडियम’वर चढते झाले. त्यामुळेच ते अनेकांच्या गळ्यातील ताईतही झाले. हेच भारतीय हॉकीमधील खेळाडू आता बोहल्यावर चढत आहेत. त्यांच्या आयुष्यातील नवा अध्याय सुरू होत आहे. खेळाडूंचा परिचय करून देणारा हा लेख...
 
हॉकी सामन्यात विजेत्यांसाठी असलेल्या ‘पोडियम’च्या मंचाची सवय असणारे ते दोन हॉकीप्रेमी, आता मंच बदलत बोहल्यावर चढत आहेत. त्या दोघांचे एकच प्रेम आहे ते म्हणजे हॉकी आणि त्यामुळेच एकमेकावर जडलेलेही. कोण आहेत बरं ते? लंडन ऑलिम्पिकच्या आधी जेव्हा मी सहकुटुंब दिल्ली दौर्‍यावर गेलो होतो, तेव्हा मनप्रीत आणि मनदीप या दोघांशी आमची भेट झाल्याचे स्मरते. त्यांच्यातील वयाने धाकला असलेला तो मनदीप व थोरला तो मनप्रीत. सगळ्यांनी धाकल्याला ‘मॅण्डी’ हे नाव ठेवलेले आठवते. भारतीय हॉकी संघातला तो ‘मॅण्डी’, आता बघता बघता आता बोहल्यावर उभा राहतो आहे.
 
पंजाबमधील जालंधरचा ३२ वर्षीय मनप्रीत सिंग पोवार जेव्हा मलेशियात सामने खेळायला गेला होता, तेव्हा मनप्रीतला एका मलेशियन मुस्लीम कन्येने आपले मन देत मनप्रीतचे मन पळवले. त्याच काळात त्या संघाचा कप्तान आणि सगळ्यांच्या मनाचा सरदार असलेला सरदार सिंग, एका इंग्लिश महिला संघातील खेळाडूला आवडला आणि सरदारवर त्या महिलेचे एकतर्फी प्रेम जडले. लग्नाचा विचार न करता ‘सतनाम वाहे गुरू की, वाहे गुरू की फते’ अशा गुरूवाणीत, क्रीडाविश्वात तसेच अध्यात्मात स्वतःला गुंतवणारा सरदार मात्र बोहल्यावर दिसणे जरा अवघडच आहे. पण, त्या सरदारचा चेला मात्र एका पंजाबी कुडीला, आपल्या नावाबरोबर आपले ‘मन’ही देऊन बसला आहे अर्थात दोघांनीही एकमेकांना मन दिले आहे.
 
हॉकीस्टार मनदीप सिंग आणि उदिता कौर हे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या ऑलिम्पियन जोडीने दि. २१ मार्च रोजी जालंधरमध्ये लग्न केले आहे.
 
आपण या जोडीचे प्रोफाईल पाहू : 
  • वर :- मनदीप सिंग
  • विभाग/राज्य : पंजाब सशस्त्र पोलीस, हॉकी पंजाब
  • जन्मतारीख : २५ जानेवारी १९९५
  • भारतासाठी अधिकृत सामने : २६०
  • भारतासाठी केलेले एकूण गोल : १२०
  • पदार्पणाचे वर्ष : २०१३
 
सहभागी झालेल्या प्रमुख स्पर्धा
 
ऑलिम्पिक खेळ
 
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ - कांस्यपदक
टोकियो ऑलिम्पिक २०२० - कांस्यपदक
 
राष्ट्रकुल खेळ
 
२१ वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०१८, गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया - चौथे स्थान
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२, बर्मिंगहॅम, इंग्लंड - रौप्यपदक
 
विश्वचषक
 
नेदरलॅण्ड्समधील हेग येथे २०१४ साली झालेल्या राबोबँक हॉकी विश्वचषक - नववे स्थान
ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक भुवनेश्वर २०१८, भारत - सहावे स्थान
‘एफआयएच’ ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक २०२३ भुवनेश्वर, राउरकेला - नववे स्थान
 
आशियाई खेळ
 
१८व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ मध्ये जकार्ता, इंडोनेशिया - कांस्यपदक
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ हांगझोऊ - सुवर्णपदक
 
ज्युनियर वर्ल्ड कप
 
हिरो हॉकी ज्युनियर विश्वचषक पुरुष २०१३, नवी दिल्ली - दहावे स्थान
उत्तर प्रदेश हॉकी ज्युनियर विश्वचषक पुरुष लखनऊ २०१६ - सुवर्णपदक
 
आशिया कप
 
आशिया कप २०१३, इपोह, मलेशिया - रौप्यपदक
 
ज्युनियर आशिया कप
 
ज्युनियर आशिया कप २०१५, कुआंतन - सुवर्णपदक
 
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी
 
हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी चेन्नई २०२३ - सुवर्णपदक
हिरो एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी ओमान २०१८ - सुवर्णपदक
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जपान २०१३ - पाचवे स्थान
 
पुरस्कार
 
२०२१ साली ‘अर्जुन पुरस्कार’
२०१९ साली हॉकी इंडियाचा ‘फॉरवर्ड ऑफ द इयर धनराज पिल्ले पुरस्कार’
 
  • वधू :- उदिता कौर
  • डिफेंडर
  • विभाग/राज्य : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, हॉकी हरियाणा
  • जन्मतारीख : १४ जानेवारी १९९८
  • भारतासाठी अधिकृत सामने : १२७
  • भारतासाठी केलेले एकूण गोल : १४
  • खेळाडू पदार्पणाचे वर्ष : २०१७
 
सहभागी झालेल्या प्रमुख स्पर्धा :
 
ऑलिम्पिक खेळ
 
टोकियो ऑलिम्पिक २०२० - चौथे स्थान
 
राष्ट्रकुल खेळ
 
कॉमनवेल्थ गेम्स २०२२, बर्मिंगहॅम, इंग्लंड - कांस्यपदक
विश्वचषक
व्हाईटॅलिटी हॉकी महिला विश्वचषक २०१८, लंडन - आठवे स्थान
२०२२ सालचा ‘एफआयएच’ महिला हॉकी
विश्वचषक स्पेन आणि नेदरलॅण्ड्स - नववे स्थान
 
आशियाई खेळ
 
१८व्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८, जकार्ता, इंडोनेशिया - रौप्यपदक
हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२२ - कांस्यपदक
 
आशिया कप
 
महिला आशिया कप, मस्कत २०२२ - कांस्यपदक
 
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी
 
महिला डोन्हे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८ - रौप्यपदक
झारखंड महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी रांची २०२३ - सुवर्णपदक
बिहार महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी राजगीर २०२४ - सुवर्णपदक
 
‘एफआयएच’ हॉकी प्रो लीग
 
‘एफआयएच’ हॉकी प्रो लीग २०२१-२२ - कांस्यपदक
‘एफआयएच’ हॉकी प्रो लीग २०२३-२४ - आठवे स्थान
‘एफआयएच’ नेशन्स कप
 ‘एफआयएच’ हॉकी महिला नेशन्स कप स्पेन २०२२ - सुवर्णपदक
 
भारतीय पुरुष हॉकी संघाचा फॉरवर्ड मनदीप सिंग दि. २१ मार्च रोजी जालंधर येथे, भारतीय महिला हॉकी संघातील डिफेंडर उदिता कौरशी विवाहबद्ध झाला आहे. मनदीप आणि उदिता दोघेही २०२० सालच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा भाग होते. मनदीपच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले, तर महिला संघ चौथ्या स्थानावर राहिला. ‘पोडियम’ मिळविण्यापासून उदिताचा संघ थोडक्यात वंचित राहिला. जालंधरच्या मिठापूर गावातील रहिवासी असलेला मनदीप, २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्‍या संघाचाही भाग होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याला पंजाब पोलिसमध्ये ‘डीएसपी’ म्हणून नियुक्त करण्यात आले.
 
हरियाणातील हिसार येथील उदिताने, २०१७ मध्ये पदार्पण केले आणि तिच्या नावावर १२७ सामने आहेत; ज्यात तिने १४ गोल केले आहेत. भारतीय क्रीडाविश्वात पुढीलप्रमाणे अशी काही जोडपी आपल्याला आठवतील. दीपिका कुमारी-अतनु दास, आकाशदीप-मोनिका मलिक, सायना नेहवाल-परुपल्ली कश्यप, गुरविंदर चंडी-मनजीत कौर आणि वेस-जेनिफर पेस या ऑलिम्पियन जोडप्याच्या यादीत, आता या जोडप्याचीही भर पडली आहे. चला आपण या नवपरिणीतांना आपले आशीर्वाद देत अशी आशा बाळगूया की, मनदीप-उदीता यांच्याकडून भारतीय हॉकीला एक नवीन हॉकीपटू मिळो, समस्त हॉकीप्रेमींच्या त्यांना शुभेच्छा.
 
हवामान बदलाबाबत चिंतातूर खेळाडू...
 
भारताचे सायना नेहवाल आणि पीआर श्रीजेश हे जगभरातील ३५० ऑलिम्पियन खेळाडूंमध्ये आहेत, ज्यांनी ‘आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अर्थात आयओसी अध्यक्षपदाच्या सात उमेदवारांना पत्र लिहून, हवामान बदलासंदर्भातील कृतींना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ८५ देशांतील ऑलिम्पियन खेळाडूंनी, ‘आयओसी’कडून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, यजमान शहरांमध्ये शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी, प्रदूषण करणार्‍या प्रायोजकांबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यासाठी आणि हवामान बदलाबाबतच्या कृतींसाठी त्यांच्या व्यासपीठाचा वापर करण्यासाठी दृढ वचनबद्धतेचे आवाहन केले आहे. दि. १८ मार्च २०२५ ते दि. २१ मार्च २०२५ या कालावधीत, ग्रीसमधील कोस्टा नॅव्हरिनो येथे झालेल्या ‘आयओसी’ नवीन अध्यक्षपदासाठी सदस्यांच्या मतदानाच्या काही दिवस आधी ही घटना घडली आहे. आठ वर्षांच्या कार्यकाळासाठी सात उमेदवारांच्या गुप्त मतदानाद्वारे करण्यात आलेल्या निवडीत, ४१ वर्षीय झिम्बाब्वेच्या कर्स्टी कोव्हेन्ट्री या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत.
 
हवामानाचे परिणाम आता दूरचा धोका राहिलेला नाही, तर आपल्या आवडत्या खेळांसाठी आणि आपल्या ऑलिम्पिक कुटुंबातील देशांसाठी सातत्याने वाढत जाणारे नुकसान असल्याचे पत्रात म्हटले आहे. त्या पत्रावर स्वाक्षर्‍या करणार्‍यांमध्ये ५७ ऑलिम्पिक विजेते आणि १०० पेक्षा अधिक खेळाडूंचा समावेश आहे; जे ऑलिम्पिक खेळांमध्ये आपापल्या देशांचे ध्वजवाहक आहेत. भारताव्यतिरिक्त, अर्जेंटिना, अरुबा, बहामास, पाकिस्तान, नेपाळ, घाना, नायजेरिया इत्यादी जगातील सर्वात जास्त हवामान संवेदनशील देशांनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. खेळाडूंनी या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, नवनिर्वाचित ‘आयओसी’ अध्यक्षांना लवकरच बैठक घेण्याची विनंती देखील केली आहे. गेल्या महिन्यात यजमान शहर गुलमर्गमध्ये बर्फवृष्टीअभावी २०२५ साली खेलो इंडिया हिवाळी खेळ सलग दुसर्‍या वर्षी पुढे ढकलण्यात आल्याने, भारतीय खेळांवर हवामान बदलाचा परिणाम दिसून आला आहे.
इति।
 
 
श्रीपाद पेंडसे

 
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
संपर्क : ९४२२०३१७०४
अग्रलेख
जरुर वाचा
कुणाल कामरा प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही...

कुणाल कामरा प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही..."

(Yogi Adityanath on Kunal kamra Controversy) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं बनवून शोमध्ये सादर केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी असू शकत नाही', अशी परखड भूमिका मांडली आहे...