मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP on Muslim Reservation in Karnataka) सरकारी कंत्राटांमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयावर विश्व हिंदू परिषदेने जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर या निर्णयाला असंविधानिक, तुष्टीकरणाची उंची आणि पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे.
हे वाचलंत का? : धर्मांध फहीमच्या घरावर फिरवला बुलडोझर!
विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंग बागड़ा यांनी बंगळुरू येथे झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेत याविशयी सांगितले. ते म्हणाले कर्नाटकचे सध्याचे सरकार अनेक प्रकारे मुस्लिम तुष्टीकरणाच्या मोहिमेमध्ये गुंतले आहे, जे हिंदू समाजाच्या द्वेष आणि न्यून विचारसरणीचा परिणाम आहे.
हिंदू ओबीसी कोट्यातून ४% मुस्लिम आरक्षण हिरावून घेतले गेले आहे, जे हिंदू ओबीसींच्या घटनात्मक अधिकारांवर अतिक्रमण करण्यासारखे आहे आणि विहिंप हे मान्य करत नाही. हा निर्णय प्रभावी होऊ नये यासाठी परिषद सर्वतोपरी प्रयत्न करेल.