'कबर नका हटवू, पण...'; आठवलेंनी नेमका कोणता उपाय सांगितला?

    24-Mar-2025   
Total Views | 40

Ramdas Athawale on Aurangzeb Tomb

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ramdas Athawale on Aurangzeb Tomb)
"औरंगजेबाची कबर हटवण्याने कोणताही तोडगा निघणार नाही. त्याऐवजी छत्रपती संभाजीनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारा"; असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. डेहराडून येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी औरंग्याच्या कबरीवरून होत असलेल्या वादात आपली भूमिका मांडली आहे.

हे वाचलंत का? : रस्त्यावर नमाज पढणाऱ्यांवर होणार कारवाई!

राज्यातील मुस्लिम बांधवांना आवाहन करत ते म्हणाले, कोणीही औरंगजेबाशी आपला संबंध जोडू नका. भारतातील मुस्लिम हे औरंगजेबाचे वंशज नाही, त्यांचा औरंगजेबाशी काहीही संबंध नाही. औरंगजेबाची कबर काढून न टाकता, छत्रपती संभाजी महाराजांचे मोठे स्मारक उभारता येईल का, याचा विचार करावा. आपल्याला संभाजी महाराजांची विचारधारा घेऊन पुढे जायचे आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा
कुणाल कामरा प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही...

कुणाल कामरा प्रकरणी योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणालाही..."

(Yogi Adityanath on Kunal kamra Controversy) स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं बनवून शोमध्ये सादर केल्याप्रकरणी मोठा वाद निर्माण झाला आहे. यावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. अशातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणालाही वैयक्तिक लक्ष्य करण्यासाठी असू शकत नाही', अशी परखड भूमिका मांडली आहे...