स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : कुणाल कामराने माफी मागावी

    24-Mar-2025
Total Views | 15
 
 No one has the right to violate the freedom Chief Minister Devendra Fadnavis on Kunal Kamra
 
 
मुंबई :  ( No one has the right to violate the freedom Chief Minister Devendra Fadnavis on Kunal Kamra ) स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. परंतू, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही. त्यामुळे कुणाल कामराने माफी मागावी अशी प्रतिक्रिया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी सोमवार, २४ मार्च रोजी दिली.
 
विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे. परंतू, स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कुणालाच नाही. २०२४ साली महाराष्ट्राच्या जनतेने कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले, हे कामराला माहिती असायला हवे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत कोणाकडे गेली हे जनतेने ठरवले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री तसेच राज्यातील वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल जनतेत आदर आहे त्यांचा अनादर करण्याचा कुणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचे आहे."
 
राहुल गांधींचे संविधान दाखवून चूक लपवता येणार नाही
 
"तुम्ही कॉमेडी आणि व्यंग जरूर करा, पण कुणी अपमानित करण्याचे काम करत असल्यास ते सहन केले जाणार नाही. कामरा यांनी माफी मागितली पाहिजे. कुणाल कामरा जे राहुल गांधींच्या संविधानाचे पुस्तक दाखवतात ते राहुल गांधींनीही वाचले नाही आणि कामरा यांनीसुद्धा वाचलेले नाही. अशा संविधानाचा फोटो काढून तुम्ही तुमची चूक लपवू शकत नाहीत. कारण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही, हे संविधानानेच सांगितले आहे. त्यामुळे कामरा यांनी माफी मागितली पाहिजे," अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अग्रलेख
जरुर वाचा