मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Imtiaz Jaleel on Aurangzeb Controversy) छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कौतुकोद्गार काढत औरंगजेब मुस्लिमांचा हिरो नसल्याचा दावा एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केला आहे. नागपुर येथे शिवजयंतीच्या दिवशी इस्लामिक कट्टरपंथींना घातलेल्या हैदोसानंतर इम्तियाज जलील यांचे हे विधान सध्या चर्चेत आहे.
"औरंगजेब मुस्लिमांचा हिरो नाही, तर सर्वशक्तिमान अल्लाह मुस्लिमांसाठी सर्व काही आहे. आमच्या प्रथा आणि परंपरांनुसार आम्ही केवळ औरंगजेबाच्या पुण्यतिथीला फक्त पुष्प अर्पण करतो. आपल्या कारकिर्दीत आपल्या सैन्यात आणि प्रशासनात मुस्लिमांना मानाचे स्थान देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आमचे नेते आणि समाजातील लोकांनी नेहमीच कौतुक करतात. आमच्या एकाही नेत्याने सार्वजनिक व्यासपीठावरून औरंगजेबाची स्तुती केलेली नाही." असे इम्तियाज जलील यांचे म्हणणे आहे. त्यांनी नागपूर हिंसाचारात पोलिसांवर कथित पक्षपातीपणाचा आरोपही केला.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक