मत्स्य व्यवसायाला 'कृषी'चा दर्जा देणार! - मंत्री नितेश राणे
पाण्यातील मासेमारीसाठी लवकरच धोरण
24-Mar-2025
Total Views | 6
मुंबई: ( Fishing will be given the status like agriculture Minister Nitesh Rane ) मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सोमवार, दि. २४ मार्च रोजी विधानपरिषदेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासावर विधान परिषदेत आमदार परिणय फुके, प्रवीण दरेकर, उमा खापरे, भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना ते बोलत होते. गोड्या पाण्यातील मासेमारी मुळे भोई आणि इतर समाजातील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे आर्थिक उत्पन्न वाढावे यासाठी सक्षम धोरण तयार करण्याचा हेतू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य विभागाचा आहे.
जेणेकरून मच्छीमार आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल आणि गोड्या पाण्याच्या मासेमारीत महाराष्ट्र राज्यात पहिल्या तीन क्रमांकावर येईल असा प्रयत्न सुरू आहे. त्याचप्रमाणे मच्छीमारांना स्वतंत्रपणे योजना सुरू करण्याचा मत्स्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न आहे. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटवीणे यालाही माझ्या खात्याकडून प्राधान्य दिले जात आहे. पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला जात आहे.
गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी अभ्यास गट तयार केले जातील. नेदरलँड, सिडनी, इंडोनेशिया या देशांच्या धरतीवर महाराष्ट्रातही मत्स्य उत्पादन वाढीसाठी मत्स्य विभागाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली.
आमदार फुके यांनी विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य शेती विषयी काही प्रश्न परिषदेत मांडले यावेळी चौकशी समितीची स्थापना करण्याची मागणी केली. यावरही मंत्री नितेश राणे यांनी पूर्व विदर्भातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल व वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल असे सांगितले.
बारा कोटीचे उत्पन्न असलेला मस्त विभाग गोड्या पाण्यातील मासेमारीतून दोन कोटी एवढेच उत्पन्न येत आहे त्यामुळे हे उत्पन्न वाढले पाहिजे . गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या कुटुंबांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गोड्या पाण्यातील मासेमारीवरील धोरण तयार करत आहोत. विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य शेती संदर्भात महसूलमंत्री बावनकुळे यांच्या सूचनाही विचारात घेऊन काम सुरू आहे, असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.