अवैधपणे भारतात प्रवेश करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांच्या टोळीचा पर्दाफाश
24-Mar-2025
Total Views | 15
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांनी भारतात अवैधपणे वावरणाऱ्या बांगलादेशी (Bangladeshi) घुसखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. टोळीने अवैधपणे प्रवेश केलेल्या बांगलादेशींना बनावट कागदपत्रे तयार करण्याची मदत केली आहे. बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत करण्यात आली होती. अशा कामांसाठी मदत करणाऱ्या चार भारतीयांची आता ओळख पटली आहे. पोलिसांनी छापा टाकून १८ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. १८ पैकी ८ बांगलादेशींना आता हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, झुल इस्लाम हा बांगलादेशी घुसखोरीला प्रोत्साहन देणाऱ्या सिंडिकेटचा प्रमुख सूत्रधार आहे. झुल इस्लाम बांगलादेशी घुसखोरांवर लक्ष ठेवून आहे. बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट आधारकार्ड बनवण्यास मदत केल्याचा आरोप चार भारतीयांवर करण्यात आला. पोलिसांनी चौघांची ओळख पटवली असून भारत- बांगलादेश सीमेवर एका दुकानात हवाला नेटवर्क चालवले जात होते.
संबंधित परिस्थिती लक्षात घेता, बांगलादेशी घुसखोरांना सिंडिकेटचा पर्दाफाश केला. संबंधित टोळींपैकी काही आरोपी हे वारंवार बांगलादेशात जात होती. या टोळीने बांगलादेशी नागरिकांना भारतात घुसखोरी, नोकऱ्या आणि बनावट कागदोपत्री उपलब्ध करून दिली आहे, बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी अवैधपणे घुसखोरांची मुलं नामांकित शाळांमध्ये ईडब्ल्यू एस नामक कोट्याचा लाभ घेतात. ही टोळी बांगलादेशातून नागरिकांना आसाममार्गे आणत असे आणि त्यांना दिल्ली एनसीआरमध्ये स्थायिक करत असे.
दिल्लीत बांगलादेशी घुसखोरांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बनावट ओळखपत्रांचा वापर करत कागदपत्रे बनवण्यात आली होती. ही टोळी बांगलादेशी घुसखोरांना लहान-मोठ्या नोकऱ्या देतात. बनावट कागदपत्रांवर आधारकार्ड बनवणाऱ्या सिंडिकेटच्या तीन प्रमुख सदस्यांसह पोलिसांनी चार जणांना अटक करण्यात आली आहे.