कबरीच्या वादात धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे महत्त्वाचे विधान! म्हणाले, "देश तोडणारी व्यक्ती..."

    24-Mar-2025   
Total Views | 20

Bageshwar Baba on Aurangzeb Controversy

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bageshwar Baba on Aurangzeb Controversy) 
बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा सध्या दोन दिवसीय ब्रज यात्रेवर आहेत. यादरम्यान त्यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून सुरु असलेल्या वादावर महत्त्वाचे विधान केले आहे. देश तोडणारी व्यक्ती कधीच महान असू शकत नाही, असे मत बागेश्वर बाबांनी केले आहे. यासोबतच त्यांनी हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी एका पदयात्रेचीही घोषणाही केल्याचे निदर्शनास आले आहे.

हे वाचलंत का? : औरंग्याच्या कबरीवर फुलं वाहणारे म्हणतात, 'औरंगजेब आमच्यासाठी हिरो नाही...'
 
ब्रज यात्रेदरम्यान बागेश्वर बाबांनी वृंदावन आणि बरसाना सारख्या पवित्र ठिकाणी ऋषी-मुनींची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या भेटीदरम्यान त्यांनी श्री कृष्ण जन्मभूमी, मांस आणि मद्य विक्री आणि हिंदू राष्ट्राची उभारणी यासारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करणारी बिचारित क्रांती यात्रा सुरू करण्याची घोषणा केली. या वर्षाच्या अखेरीस वृंदावन येथून हा प्रवास सुरू होईल.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी कुरुक्षेत्रात ब्राह्मणांवर झालेल्या गोळीबाराची घटना निंदनीय गुन्हा असल्याचे म्हटले आहे. यावर सरकारने कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. औरंगजेबावर भाष्य करताना ते म्हणाले की, जो देश तोडतो तो कधीच महान असू शकत नाही, मात्र देशाला जोडणारा माणूसच महान असतो.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा