लखनौ : ( Akhilesh Yadav controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj ) समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांनी या मुद्द्यावरून अखिलेश यादव यांनी माफी मागावी. तसेच, चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी जयकुमार रावल यांनी केली आहे. ‘सपा’ नेते अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
“शिवाजी महाराज का तिलक उनके पैर के अंगूठे से किया गया था,” असे त्यांनी म्हटले आहे. अखिलेश यादव यांच्या या विधानावर भाजपने आक्षेप घेतला आहे. ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पद्धतीने सांगण्याचे हे षड्यंत्र असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ‘इतिहासाशी छेडछाड स्वीकार केली जाणार नाही. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. त्यांचा सन्मान करतो.
त्यामुळे अखिलेश यादव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तत्काळ माफी मागितली पाहिजे. तसेच चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी जयकुमार रावल यांनी केली आहे.