कोकण रेल्वेची वाहतूक ४ ते ५ तास उशीरा! ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विलंबाने

    23-Mar-2025
Total Views |
 
Railway
 
मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर वेरवली दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने शनिवार, २२ मार्च रोजी वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, रविवारी दुसऱ्या दिवशीही ही वाहतूक ४ ते ५ तास विलंबाने सुरु असल्याची माहिती आहे.
 
हे वाचलंत का? -  मनसेच्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल! संदीप देशपांडे मुंबईचे शहराध्यक्ष तर अमित ठाकरे...
 
शनिवारी दुपारी राजापूर दरम्यान वेरवलीजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत ११ गाड्यांना याचा फटका बसला. त्यानंतर तब्बल तीन ते साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत करण्यात आली. परंतू, रविवारीही अनेक गाड्या उशीराने धावत असल्याचे सांगण्यात येत आहे.