मुंबई : नेटफ्लिक्सवर नेहमीच नवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध असतात. नुकतीच नेटफ्लिक्सने त्यांच्या टॉप 10 ट्रेंडिंग चित्रपटांची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही काही महत्त्वाचे सिनेमे मिस केले असतील, तर ही यादी तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते.
1. थंडेल (Thandel)
दाक्षिणात्य सिनेमाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांचा ‘थंडेल’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर सध्या सर्वाधिक ट्रेंड करत आहे. दमदार अभिनय आणि कथानकामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडतोय.
2. नादानियां (Nadaaniyan)
इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या पदार्पणाचा ‘नादानियां’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर दुसऱ्या क्रमांकावर आहे. समीक्षकांनी अभिनयावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी, प्रेक्षकांनी मात्र चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
3. इमर्जन्सी (Emergency)
कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ हा सिनेमा 17 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळवू न शकलेला हा सिनेमा ओटीटीवर मात्र तुफान गाजतोय. 17 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला हा चित्रपट तिसऱ्या स्थानावर आहे.
4. विदामुयार्ची (Vidaamuyarchi)
अजित कुमार, अर्जुन सरजा, त्रिशा आणि रेजिना कैसांद्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा दाक्षिणात्य सिनेमा चौथ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. या चित्रपटाचे दमदार अॅक्शन सीन्स आणि कथानक प्रेक्षकांना खूप आवडले आहे.
5. आजाद (Azaad)
रवीना टंडनची मुलगी राशा थडानी आणि अजय देवगणचा भाचा अमन देवगन यांचा पदार्पणाचा ‘आझाद’ हा चित्रपट जानेवारीत थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळाले नसले तरी, नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पाचव्या क्रमांकावर आहे.
जर तुम्ही यापैकी काही चित्रपट पाहिले नसतील, तर नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये यांना स्थान द्या आणि नेटफ्लिक्सवर तुमच्या आवडीचे सिनेमा एन्जॉय करा!
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.