मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार यशस्वी ठरला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशल अभिनीत हा ऐतिहासिक सिनेमा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. रिलीजनंतर ३५ दिवसांनंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जोरदार सुरू असून, कमाईचे विक्रम मोडत आहे.
'छावा’ ओटीटीवर कधी येणार?
प्रेक्षकांना आता घरबसल्या ‘छावा’ पाहण्याची संधी मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
३५ दिवसांत ‘छावा’चा दमदार गल्ला!
'छावा'ने आतापर्यंत भारतात ५७२.९५ कोटी रुपयांची तर जगभरात ७७०.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. प्रदर्शित होऊन ३५ दिवस झाले असले, तरी प्रेक्षकांची उत्सुकता अजूनही कायम आहे.
'छावा'ची तगडी स्टारकास्ट:
या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकली आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना, तसेच आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, डायना पेंटी, संतोष जुवेकर, निलकांती पाटेकर, सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पायरसीचा फटका!
यशस्वी वाटचाल सुरू असतानाच ‘छावा’ चित्रपट पायरसीला बळी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.
ओटीटी रिलीजच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असताना, ‘छावा’ला मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी हुकवू नका!
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.