NIA चे पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल! नागपूर हिंसाचारानंतर प्रशासन अलर्ट मोडवर

    21-Mar-2025
Total Views | 14
 
nia team in chhatrapati sambhajinagar
 
छत्रपती संभाजीनगर : (NIA Team in Chhatrapati Sambhajinagar) राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापले आहे. यातच नागपूरमध्ये दंगल (Nagpur Violence) उसळल्याने आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याच वादाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयए (NIA) चे दिल्लीचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. संभाजीनगरमधील संशयित हालचालींवर एनआयएकडून लक्ष ठेवले जाणार आहे. औरंगजेब कबरीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दंगल किंवा तणाव निर्माण होण्याची चिन्हं असल्याने jराज्यातील प्रशासन तसेच सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.
 
सध्या एनआयएच्या एका पथकाने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधील कबर असलेल्या खुलताबाद (Khuldabad) परिसराची पाहणी केली आहे. याशिवाय मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, बीड, उदगीर याठिकाणी देखील एनआयएकडून पाहणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मराठवाड्याला लागून असलेल्या विदर्भातील बुलढाणा या जिल्ह्यात देखील या पथकाचे विशेष लक्ष आहे. मराठवाड्यामध्ये विशेष लक्ष देत असताना ज्या जिल्ह्यांना दंगलीची पार्श्वभूमी आहे त्या ठिकाणी संशयित व्यक्तींच्या हालचालींवरही एनआयएचे लक्ष आहे. या प्रकरणात स्थानिक एटीएस अधिकाऱ्यांची मदत घेतली जात असल्याचीही माहिती आहे.
 
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद या भागात औरंगजेबाची कबर (Aurangzeb's Tomb) आहे. ही कबर हटवण्यात यावी अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. याच पार्श्वभूमीवर बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेकडून महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यातच १७ मार्च रोजी नागपूर दंगल उसळली होती. नागपूरात झालेल्या याच दंगलीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता एनआयएचे पथक छत्रपती संभाजी नगर शहरात दाखल झाले आहे. दरम्यान, नागपूरमध्ये हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी २१ मार्च रोजी नमाजानिमित्त शहरातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. नागपूरात मशिदींबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शहरात पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नागपूर पोलीस सतर्कतेने पहारा देत आहेत.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

रामकथांचा विश्वविख्यात विदेशी अभ्यासक, साधक डॉ. कामिल बुल्के

Ram Katha भारत सरकारने 1972 साली ‘पद्मभूषण’ देऊन सन्मानित केलेले, हिंदी भाषेचे विद्वान आणि राम, रामायण व समग्र विश्वातील रामकथेचे ख्यातनाम मर्मज्ञ-संशोधक डॉ. कामिल बुल्के यांचा ‘रामकथा : उगम आणि विकास’ हा हिंदी भाषेत लिहिलेला शोधप्रबंध जगातील सर्वच विद्यापीठांनी गौरवलेला आहे. रामकथेचा विश्वविख्यात विदेशी अध्ययनकर्ता संशोधक म्हणून डॉ. कामिल बुल्के ओळखले जातात. एक विदेशी गोरा माणूस ‘ईसाई मिशनरी’ म्हणून भारतात येतो काय आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व मिळवून रामकथेचा मर्मज्ञ होतो काय, “रामकथेचा अभ्याच हीच माझी साधना,..

मर्चंट नेव्हीमधील आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

मर्चंट नेव्हीमधील आव्हाने, चिंता आणि भविष्यातील मार्ग

‘ Merchant Navy’ अर्थात व्यापारी जहाजांचे सध्याच्या काळात असलेले महत्त्व हे वादातीत आहे. अनेक देशातील खलाशी या क्षेत्रामध्येच यशस्वी करिअर घडवितात. देशालादेखील यातून लाभच होत असतो. मात्र, या खलाशांच्या जीवनावर मात्र कायमच धोक्याचे सावट असते. त्यात अनेकदा अडचणीमध्ये सापडल्यावर कंपन्यादेखील या खलाशांना वार्‍यावर सोडून देतात. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते. आजकाल या घटनांच्या वारंवारतेत वाढ झाली आहे. त्यामुळे खलाशांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक कडक नियम आणि त्याच्या पालनाची गरज आंतरराष्ट्रीय स्तरावर ..