तिरुअंनतपुरम : भारतात अवैधपणे घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशींची (Bangladeshis) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुंबई, पुणे, बंगळुरूप्रमाणेच आता घुसखोरी करणारे बांगलादेशी निमशहरीकरणातही घुसखोरी करत आहेत. अशातच आता केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात २ बांगलादेशी अवैध घुसखोरी करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. पोलिसांना त्यांना २० मार्च रोजी आपल्या ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी घुसखोऱ्यांचे नाव मोनिरुल मुल्ला आणि अल्ताफ अली अशी अटक झालेल्या घुसखोरांची नावे आहेत. दोघेही बांगलादेशातील मोहम्मदनगरचे निवासी आहेत. हे दोघेही २०१७ या वर्षात भारतात आले. त्यानंतर त्यांनी प. बंगालमध्ये घुसखोरी केली. त्यानंतर इतर घुसखोरांप्रमाणे त्यांनी बनावट अधारकार्ड बनवले. त्यांनी त्याआधारे एक सिमकार्डही घेतले. त्यानंतर त्यांनी मोबाईल आणि एक भाडेतत्वावर दुकानही विकत घेतले होते. पोलिसांच्या तपासादरम्यान, दोन्ही बांगलादेशी घुसखोरांनी सांगितले की. केरळमध्ये ते छोटे मोठे काम करत आपला उदरनिर्वाह करताना दिसत आहेत.
अवैध घुसखोरी करणारे मोनिरुल मुल्ला आणि अल्ताफ अली एका दलालाच्या सहाय्याने त्याने घुसखोरी केली. त्यानंतर बांगलादेशात असलेल्या आपल्या कुटुंबाला त्या संबंधित दलालाच्या माध्यमातून पैसे पोहोचवायचे काम सुरू आहे. घुसखोऱ्यांना कोणी मदत केली? ते भारतात कसे आले? यामागील सहकार्य करणारी व्यक्ती कोण आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर पोलीस मिळवत आहेत. या प्रकरणात लक्ष्य घालत आहेत.
दरम्यान, आता मुंबई, पुणे, बंगळुरू, केरळातच नाहीतर आता काही छोट्या शहरांमध्येही बांगलादेशींची अवैधपणे घुसखोरी सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीतही एक बांगलादेशी बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत होता. अमीर हुसैन असे त्याचे मूळ नाव असूनही त्याने अमिर शेख या नावाने बनावट ओळखपत्र बनवले होते. त्याच्याच मदतीने तो सांगलीत वास्तव्य करत होता. याप्रकरणी सांगली पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.