गेटवे ऑफ इंडियाच्या पाच नंबर जेट्टीवर तात्पुरती बोट सुविधा - नितेश राणे
21-Mar-2025
Total Views |
मुंबई: ( Nitesh Rane on Temporary boat facility at Jetty No 5 of Gateway of India ) गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्यादृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया दरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’कडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार प्रायोगिक तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात ४९ बोटींना परवानगी देण्यात आली आहे. तसेच, या मार्गाचा वापर करणार्या बोटींमधून वाहतूक करणार्या प्रत्येक प्रवासाचे दर निश्चित करण्यात आले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिली.
गेटवे ऑफ इंडिया येथील पाच नंबर जेट्टीवरील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने मांडवा ते गेटवे ऑफ इंडियादरम्यान स्पीड बोट चालविण्यासाठी इच्छुक मालकांनी ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’कडे प्रस्ताव दिले. या ४९ प्रस्तावांना मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया, बेलापूर आणि एलिफंटा या जलमार्गासाठी तात्पुरत्या स्वरूपात प्रायोगिक तत्त्वावर दि.
२५ मे रोजीपर्यंत प्रतिमहिना प्रति स्पीडबोटीसाठी 4 हजार, 999 रुपये (जीएसटीसहित) किंवा डिसेंबर, २०२४ ते मे, २०२५ या कालावधीकरिता रक्कम ३० हजार रुपये (जीएसटीसहित) इतके परवानगीकरिता प्रवासी शुल्क ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’मार्फत निश्चित करण्यात आले आहे.