दिल्लीतील 'या' महिलांना मिळणार 'महिला समृद्धी योजने'चा लाभ
21-Mar-2025
Total Views | 7
नवी दिल्ली : दिल्लीत भाजपचे सरकार आले असून दिल्लीत रेखा गुप्ता या भाजपच्या महिला मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महिला समृद्धी योजनेवर भाष्य केले होते. महिलांना या योजनेच्या माध्यमातून प्रतिमहा अडीच हजार रुपये देण्यात येणार असल्याची त्यांनी घोषणा केली. ज्यांच्या बीपीएल कार्डवर अनेक महिलांची नावे असली तरीही त्यापैकी एकाच महिलेला त्याचा लाभ मिळेल, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.
तीनहून अधिक मुले असलेल्या महिलांना लाभार्थी यादीतून वगळण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एवढेच नाहीतर तीन मुले असलेल्या महिलांनाही जर लसीकरण केले नसल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेमध्ये बीपीएल २१ ते ६० वयोगटातील कार्डधारक महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
सूत्रांनी स्पष्ट केले की, जर एका बीपीएलने कार्डवरील एकाहून अधिक महिलांचे नाव असल्यास बीपीएल कार्डमध्ये नमूद करण्यात आलेल्या वयानुसार सर्वाधिक वयस्कर महिलेला या योजनेचा लाभ मिळू शकतो. विधवा, किंवा वृद्धपकाळ निवृत्तीवेतन सारख्या इतर कल्याणकारी योजनांमधून अशीच मदत मिळाल्यास सर्वात वृद्ध महिलेला सुविधा दिली जाणार आहे.
दिल्लीत भाजप निवडून आल्यानंतर रेखा गुप्ता यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवण्यात आले. त्यांनी समृद्धी योजनेसह अनेक मोफत सुविधांचे आश्वासन दिले, ज्यामुळे महिलांच्या दरमहा २ हजार ५०० रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जातील. महिला दिना दिवशीच रेखा गुप्ता यांनी महिला समृद्धी योजनेची घोषणा केली. त्यासाठी दिल्ली मंत्रिमंडळाने महिलांसाठी ५ हजार १०० कोटीं रुपयांएवढा आर्थिक साठा वाटप करण्यासाठी हिरवा कंदील दर्शवला आहे.
संबंधित योजना ही गेल्या पाच वर्षांपासून दिल्लीत वास्तव्य करणाऱ्या महिलांसाठी आहे. वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि ज्यांना आयकर भरण्याची आवश्यकता नाही अशा महिलांसाठी फायदेशीर आणि खुली करण्यात आली आहे.