कुष्ठपीडितांचे अनुदान वाढविल्याबद्दल राज्य शासनाचे आभार: राम नाईक

    20-Mar-2025
Total Views | 4

Thanks to the state government for increasing subsidy for leprosy victims Ram Naik 
 
मुंबई: ( Thanks to the state government for increasing subsidy for leprosy victims Ram Naik ) राज्यातील कुष्ठपीडितांना दरमहा मिळणारे अनुदान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने रु. 2,000/- वाढवून रु. 6000/- करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व कुष्ठपीडितांसाठी दीर्घकाळ लढणारे श्री राम नाईक यांनी आभार मानले आहेत. काल विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री श्री प्रकाश आबिटकर यांनी राज्य शासनाने कुष्ठपीडितांचे अनुदान सहा हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठविला असल्याची माहिती दिली. त्यावर सदर प्रतिक्रिया श्री राम नाईक यांनी व्यक्त केली आहे.
 
देशभरातल्या कुष्ठपीडितांच्या सक्षमीकरणासाठी श्री नाईक गेली अनेक वर्षे सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्नांमुळे केंद्र सरकारने कुष्ठपीडितांना दरमहा निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय वर्ष 2008 मध्ये घेतला होता. आता हा निर्वाह भत्ता वाढविण्याची गरज असल्यामुळे त्यासाठी श्री राम नाईक तसेच राज्यातील विविध कुष्ठ पीडित संस्था मागणी करत होत्या. गेल्याच महिन्यात कै.बाबा आमटे यांच्या 'महारोगी सेवा समिती'च्या अमृत महोत्सव कार्यक्रमामध्ये ही श्री राम नाईक यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला होता. त्यावेळी हे अनुदान वाढविण्याचे आश्वासन तिथे उपस्थित मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. 'बोले तैसा चाले' असे महायुतीचे राज्य आहे असे म्हणून प्रत्यक्षातही अनुदान वाढीचा निर्णय झाल्याबद्दल श्री नाईक यांनी अतीव समाधान व्यक्त केले.
 
कुष्ठरोगामुळे येणारे अपंगत्व आणि विद्रुपता यामुळे कुष्ठपीडितांना उदर निर्वाहासाठी कोणताही व्यवसाय करणे अशक्यप्राय होते, भीक मागण्या वाचून पर्यायात उरत नाही आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने दैनंदिन जीवन जगता येईल एवढे अनुदान दिले गेले पाहिजे, अशी श्री नाईक यांची मागणी होती. श्री नाईक उत्तर प्रदेशचे राज्यपाल असताना तेथील कुष्ठपीडितांना पंतप्रधान व मुख्यमंत्री आवास योजनेच्या समन्वयाने पाणी, गॅस आदी सोयींनीयुक्त घरे बांधून देण्यात आली होती. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही योजना मंजूर झाली असून पनवेल येथे सध्या कुष्ठपीडितां साठी घरे उभारण्याचे काम सुरू आहे. राज्यभरातील सर्वच कुष्ठपीडितांना लवकरात लवकर घरे मिळतील, अशी आशाही श्री नाईक यांनी व्यक्त केली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सचिन-सचिन हुशार दिग्दर्शकांची जोडी येणार एकत्र; गुलकंद १ मे ला जवळच्या चित्रपटगृहात!

सचिन-सचिन हुशार दिग्दर्शकांची जोडी येणार एकत्र; गुलकंद १ मे ला जवळच्या चित्रपटगृहात!

मुंबई : दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि लेखक सचिन मोटे या जोडीने आजवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरजंन केले आहे. वेगवेगळ्या शोज, मालिकेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना हसण्यास भाग पाडले. मात्र आता ही जोडी एक वेगळा जॉनर घेऊन मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित 'गुलकंद' चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या जोडगोळीची अनोखी जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, समीर चौघुले, ईशा डे यांच्या प्रमुख भूमिका ..

बांगलादेशात शेख हसीनांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला, ३ निष्पाप सदस्यांना अटक

बांगलादेशात शेख हसीनांच्या समर्थकांवर धर्मांधांकडून हल्ला, ३ निष्पाप सदस्यांना अटक

Bangladesh अवामी लीगच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार राहण्यास भाग पाडले. त्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. त्यानंतर अवामी लीगचे मतदार, पक्षाचे सदस्य आणि अल्पसंख्यांक हिंदूंवर अन्याय अत्याचार करण्यात आला आहे, आजही त्यांच्यावर अन्याय अत्याचार करत आहेत. अशातच शुक्रवारी २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी अवामी लीगशी संबंधित असलेल्या लोकांनी ढाक्यातील धनमोंडी परिसरात एका रस्त्यावर मोर्चा काढला. ज्यात पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करण्यात आले आणि ..