"महिलांना प्रतिमहा आर्थिक पाठबळ दिले जाते तर पुरूषांनाही प्रतिमहा दारूची बाटली द्या", जनता दल सेक्युलचे आमदार एमटी कृष्णाप्पांची अजब मागणी
20-Mar-2025
Total Views | 19
बंगळुरू : कर्नाटक राज्यातील जनता दलाचे आमदार एमटी कृष्णाप्पा (MLA MT Krishnappa) यांनी विधानसभेत बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाने ते पुन्हा एकदा नकारात्मक दृष्टीकोन घेऊन प्रकाशझोतात आले आहेत. काही राज्यांमध्ये महिलांना संबंधित राज्य सरकार प्रतिमहा २ हजार तर महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून १५०० रुपये दिले जात आहेत. यावरून कर्नाटकातील पुरूषांना का काही नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जर महिलांना पैसे तर पुरूषांनाही मद्य दिले जावे, असे बेताल वक्तव्य एमटी कृष्णाप्पा यांनी केले आहे.
त्यांनी केलेल्या विधानाने सभागृहात गदारोळ झाला असल्याचे चित्र आहे. एमटी कृष्णाप्पा यांनी कर्नाटकातील विधानभवनात बोलत असताना पुरूषांच्या बाजूने चुकीचा दावा केला आहे. ते म्हणाले की, जर महिलांना जर आपण महिन्याचा आर्थिक पाठबळ देता. तसेच एसटीच्या प्रवासासारख्ये अनेक सुविधा महिलांना देण्यात येतात. अशाच प्रकारे पुरूषांना महिन्याला मद्याची बॉटल देण्यात यावी असा निरर्थक आणि निर्लज्ज दावा केला आहे.
सरकार हे काम सोसायटीच्या माध्यमातून करू शकते असा दावा एमटी कृष्णा यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अलिकडेच महसूल ३६,५०० कोटी रुपयांवरून ४० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याच्या घोषणेला उत्तर देताना टिप्पणी केली.
त्यांच्या या प्रतिक्रियेवर काँग्रेस नेत्यांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे. कर्नाटक उर्जा मंत्री केके जॉर्ज यांनी या प्रस्तावाला नाकारले. त्यांनी सांगितले की, तुम्ही निवडणूक जिंका आणि पुन्हा असे कृत्य करा, आम्ही लोकांना मद्य पिण्यास विरोध करत आहोत. जरण आपणच मद्य वाटत फिरत बसलो तर काय होईल? असा प्रश्न त्यांनी निर्माण केला.