बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी अकोला जिल्ह्यात ६ ठिकाणी गुन्हा दाखल! तब्बल ५२ जणांचा समावेश
20-Mar-2025
Total Views |
मुबंई : बांग्लादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील ६ ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवार, २० मार्च रोजी दिली आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बार्शीटाकळी, रामदासपेठ (अकोला शहर), मूर्तिजापूर आणि पातूर याठिकाणी बांगलादेशी, घुसखोरांनी बनावट कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवले. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५), २२९, २३६, २३७, ३१८(४), ३३६(३), ३४०(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.